सोयाबीन पीकावरील मोझॅक विषाणूवरील उपाययोजनाबाबत कृषी विभागाच्या सूचना
उस्मानाबाद,दि.06(जिमाका) :-सोयाबीन पीकावरील मोझॅक या विषाणूजन्यी रोगापासून सोयाबीन पीक संरक्षण करण्यासाठी राज्याच्या कृषी विभागाने उपायोजना सुचविल्या आहेत.त्याचा उपयोग करावा,असे आवाहन पुणे येथील कृषी आयुक्तालयातील कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण )विकास पाटील यांनी केले आहे.
मोझॅक व्हायरसमुळे रोगग्रस्तश झाडांच्याा पानांच्याआ शिरा पिवळया पडतात तसेच फिक्क1ट हिरवे आणि पिवळसर हिरव्या रंगाचे पट्टे पानांवर दिसून येतात. झाडांची पाने गुंडाळली जातात. पानांवरील पेशी नष्टग होतात आणि झाड वाळते. त्यानंतर रोगग्रस्तन झाडापासून तयार होणारे बियाणे आकाराने लहान आणि सुरकतलेले असते.त्या्ची उगवण क्षमता कमी होते. साधारणपणे 30 0से. पेक्षा जास्तत तापमान या रोगास पोषक आहे. या हवामानात रोगाची लक्षणे ठळकपणे दिसून येतात.या रोगाचा प्रसार प्रामुख्यााने मावा या कीडीद्वारे तसेच बियाणेद्वारे होतो.
यारोगाचे व्यवस्थापन करण्यासाठी विषाणूविरहित चांगल्याी प्रतीचे बियाणे पेरणीसाठी वापरावे.रोगाची लक्षणे दिसताच विषाणूजन्यक रोगग्रस्तत झाडे उपटून नष्टर करावीत.विषाणूजन्यग रोग प्रभावित क्षेत्रातील सोयाबीन बियाण्यारसाठी वापरु नये.या विषाणूजन्यव रोगाचा प्रसार प्रामुख्यााने मावा या कीडीद्वारे होत असल्यालने मावा या कीडींच्याो नियंत्रणासाठी मोनोक्रोटोफॉस या कीटकनाशकाची 15 मि.ली. 10 लि. पाण्याीत किंवा इमिडाक्लोंरोपिड 17.8 टक्केक एस.एल या कीटकनाशकाची 4 मि.ली. प्रती 10 लि. पाण्या्त मिसळून फवारणी करावी.पिवळा मोझॅक हा विषाणूजन्यए सोयाबीन पीकावर रोग आहे. तो मूगबिन येलो मोझॅक या विषाणूमुळे होतो.या रोगाचा प्रसार प्रामुख्यााने पांढरी माशी या कीटकाद्वारे होतो.
रोगट झाडांच्याा पानांचा काही भाग पिवळसर दिसून येतो. ही या रोगाची लक्षणे आहेत.शेंडयाकडील पाने पिवळी पडून आकाराने लहान होतात. बाधित झाडाची वाढ पूर्णपणे खुंटते.पाने सुरकतून जातात. फुलांची आणि शेंगाची संख्याही कमी होते. सोयाबीनच्यां उत्पकन्नावर रोगाचा विपरीत परिणाम होतो.या रोगाचा प्रसार पांढरी माशी या कीटकाद्वारे होतो.
या रोग व्यवस्थापन करण्यासाठी ज्या पांढ-या माशीद्वारे त्याचा प्रसार होतो. त्या पांढ-या माशीच्याव नियंत्रणासाठी आंतरप्रवाही कीटकनाशकांचा वापर करावा. डायमिथोएट 30 टक्के प्रवाही 10 मि.ली. किंवा मिथील डेमेटॉन 25 टक्केा प्रवाही 10 मि.ली. 10 लिटर पाण्या त मिसळून फवारणी करावी.रोगाची लक्षणे दिसताच शेतातील रोगग्रस्तम झाडे उपटून नष्टा करावीत.सोयाबीन पीकात आंतरपीक आणि मिश्र पीक घेतल्याटस रोगाचे प्रमाण कमी आढळते.पिवळे चिकटे सापळे सोयाबीन पीकात हेक्ट्री 10 ते 12 प्रमाणे लावावेत.
या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येताच वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. या पार्श्वभुमीवर या रोगांचा सोयाबीन पीकावर प्रादुर्भाव दिसताच शेतकऱ्यांनी कराव्यात असेही आवाहन श्री.पाटील यांनी केले आहे.
******