श्री विठ्ठलसाई कारखान्याचे हंगामाचे रोलर पूजन संपन्न
उमरगा (महादेव पाटील)
श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२१-२२ या गाळप हंगामाचा मिल रोलर पूजन व हायड्रोलिक ट्रिपलर बांधकामाचे भुमीपूजन समारंभ मंगळवारी (दि.१०) रोजी सकाळी कारखान्याचे चेअरमन बसवराजजी पाटील, माजी डीसीसी बँक चेअरमन बापुरावजी पाटील, जि प विरोधी पक्षनेते शरण पाटील, व्हा. चेअरमन सादिकमिया काझी व सर्व संचालक मंडळाच्या हस्ते कारखाना कार्यस्थळावर संपन्न झाला.
येणाऱ्या गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये ५ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. सध्या हंगामातील दुरुस्ती ची सर्व कामे प्रगतीपथावर असून आवश्यक सर्व व्यवस्था करण्यात नियोजन चालु आहे. सर्वांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडेल अशी खात्री कारखान्याचे चेअरमन बसवराजजी पाटील यांनी व्यक्त केली.
या वेळी कारखान्याचे संचालक शरणप्पा पत्रिके, केशव पवार, विठ्ठलराव बदोले, विठ्ठलराव पाटील, दिलीप भालेराव, शिवलिंग माळी, माणिक राठोड, राजू हेबळे, सुभाष पाटील व सर्व संचालक मंडळ, पं स सभापती सचिन पाटील, जि. प. चे माजी सदस्य गुंडाप्पा भुजबळ, ऊस उत्पादक शेतकरी, तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री.एम.बी. अथणी, चिफ इंजिनियर श्री ए. एल. अष्टेकर, चिफ केमीस्ट श्री एस.बी. गायकवाड, मुख्य शेतकी अधिकारी ए.बी. राखेलकर, कार्यालय अधिक्षक श्री के.एम. चौगुले, सर्व अधिकारी, कामगार, कर्मचारी उपस्थित होते.