उस्मानाबाद जिल्ह्यातील रेल्वेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील - खासदार ओमराजे निंबाळकर.
उस्मानाबाद :- शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे कार्यतत्पर, कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, युवा सेना प्रमुख राज्याचे पर्यटन मंत्री आदित्यजी ठाकरे साहेब, संपर्क प्रमुख, माजी मंत्री प्रा.तानाजीराव सावंत साहेब, पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख-पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षाचे जनोपयोगी कार्य तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर साहेब, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ.कैलास घाडगे-पाटील साहेब यांनी तुळजापूर तालुक्यातील काटी, खुंटेवाडी, सावरगाव, केमवाडी, जळकोटवाडी, वडगावकाटी, गंजेवाडी, तामलवाडी, काटगाव, बसवंतवाडी या गावांमध्ये शिवसंपर्क अभियान राबविण्यात आले. या शिव संपर्क अभियानावेळी तुळजापूर तालुक्यामध्ये विविध ठिकाणी पक्ष संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
येत्या काळामध्ये शिवसेनेची संपर्क कार्यालये म्हणजे फक्त पक्ष विस्ताराची कार्यालय नसून ते खेड्यापाड्यातील अशिक्षीत लोकांच्या अडचणीचे सोडवणुक केंद्र बनले पाहिजे असे यावेळी बोलताना सांगितले. इतर पक्षांच्या कार्यालयाप्रमाणे आपल्या पक्षाचे कार्यालय हे फक्त पक्ष कार्यालय नसून ते जनसामान्यांना अडचणीत असलेल्या प्रत्येक नागरिकाला आपले हक्काचे घर वाटावे असे कार्य गावातील प्रत्येक कार्यकर्त्याकडून आणि संपर्क कार्यालयाच्या प्रत्येक शाखा प्रमुखांकडून घडावे. कार्यकर्ता हा कोणत्याही पक्षाचा कणा असतो त्यामुळे शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याने आपली आणि आपल्या पक्षाची नाळ तळागाळातील लोकांच्या चुलीपर्यंत नेली पाहिजे. सर्वसामान्य लोकांना शिवसेना हा फक्त एक पक्ष नसून शिवसेना म्हणजे आपल्या हक्काचे व्यासपीठ, शिवसेना म्हणजे आपले हक्काचे घर कसे वाटेल यासाठी शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याने प्रयत्न केले पाहिजेत. विरोधकांना शब्दाने उत्तर न देता आपल्या पक्षाच्या कार्याने आणि जनसामान्यांच्या अडचणींची सोडवणूक करून विरोधकांना उत्तर द्यावे असा ही एक कानमंत्र यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांना दिला.
शिवसेना हा एक पक्ष नसून हा एक विचार आहे त्यामुळे विरोधकांनी कितीही कटकारस्थाने केली तरी विचार कधीच संपत नसतो विचार अमर असतो आपण शिवसेनेचे कार्यकर्ते आहोत हे आपले भाग्य आहे. या भागांच्या संपूर्ण सर्वसमावेशक विकासासाठी माझ्या समवेत, पक्षातील सहकारी सदैव आपल्या सोबत आहोत असेही वचन यावेळी उपस्थितांना मा.खासदार यांनी दिले.
तुळजापूर तालुक्यातील मौजे बसवंत वाडी येथील ही शेकडो नागरिकांनी पक्षश्रेष्ठींच्या कामावर विश्वास ठेवून हातामध्ये शिवबंधन बांधून शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश केला.
यावेळी शिवसेना जिल्हा महिला आघाडी प्रमुख श्यामलताई वडणे, माजी उपजिल्हा प्रमुख श्याम पवार, शिवसेना तालुका प्रमुख जगन्नाथ गवळी, माजी उपतालुका प्रमुख प्रदीप मगर, भिमाण्णा जाधव, एच. एम. देवकते, चेतन बंडगर, अर्जुन आप्पा साळुंके, प्रतीक बप्पा रोचकरी, सागर इंगळे, राम मोगरकर यांच्यासह विविध गावातील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.