व्यवसाय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याबाबत आवाहन
उस्मानाबाद,दि.25(जिमाका):-
उस्मानाबाद येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये प्रवेशासाठी पुढील व्यवसाय अभ्यासक्रमाचे प्रवेश अर्ज भरण्याची ऑनलाईन प्रक्रिया सुरु झाली आहे. अर्ज हा http://admission.dvet.gov.in या संकेत स्थळावर Admission Activities मथळ्याखाली Application Form वर क्लिक करुन प्रवेश अर्ज भरावा.
एक वर्षीय मुदत व्यवसाय अभ्यासक्रमामध्ये (बीगर अभियांत्रिकी गट) बेसिक कॉस्मेटोलॉजी, ड्रेसमेकिंग, कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट, डेस्कटॉप पब्लिशिंग ऑपरेटर, फ्रुट अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग, सेक्रेटरियल प्रॅक्टीस, मेसन (अभियांत्रिकी), संधाता (अभियांत्रिकी), कारपेंटर (अभियांत्रिकी) हे व्यवसाय अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
दोन वर्षीय मुदत असलेल्या व्यवसाय अभ्यासक्रमामध्ये (अभियांत्रिकी गट) विजतंत्री, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, जोडारी, मशिनिष्ट, यां.मोटारगाडी, यांत्रिक प्रशितन व वातानुकूलीत, पेंटर (जनरल), टूल अँड डाय मेकर, टर्नर, वायरमन हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.अर्ज भरण्याची अंतिम मुदत दि. 31 ऑगस्ट 2021 अशी आहे, अशीही माहिती शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य श्री.एस.बी.वाघमारे यांनी दिली आहे.
*****