google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 जिल्ह्यातील अर्थकारण व तरूणांच्या उद्योगाला प्रोत्साहन देऊ :- चेअरमन अभिजीत पाटील

जिल्ह्यातील अर्थकारण व तरूणांच्या उद्योगाला प्रोत्साहन देऊ :- चेअरमन अभिजीत पाटील

0

जिल्ह्यातील अर्थकारण व तरूणांच्या उद्योगाला प्रोत्साहन देऊ :- चेअरमन अभिजीत पाटील
 
(उस्मानाबाद येथील DVP दि पिपल्स मल्टीस्टेट मुख्य शाखेचा लोकार्पण सोहळा संपन्न)

उस्मानाबाद /- 

DVPदि पिपल्स मल्टीस्टेट शाखा उस्मानाबाद उदघाटन उस्मानाबादचे खासदार श्री.ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास  पाटील, उस्मानाबाद जनता बँकेचे अध्यक्ष ब्रिजलाल  मोदाणी, मा. अध्यक्ष वसंतराव नागदे, धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत  पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती पार पडला.




यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले की, आपल्या मराठवाड्यात जर असे उद्योजक उभा राहत असतील आणि आपल्या भागाला आर्थिकदृष्टया सुजलाम सुफलाम करण्यास तयार होत असतील तर मी आणि माझे सर्व सहकारी कायम आपल्या सोबत आहोत. बँका या ग्रामीण अर्थकारणाचा कणा आहेत. अशा संस्था नावापूरत्या न चालवता सर्वसामान्यांच्या हितासाठी चालवणे गरजेचे आहे. उस्मानाबाद व परिसरातील शेतकरी बांधवांचा आर्थिक व्यवहार सुखकर करण्यासाठी ही बँक मदत करेलच आणि युवा उद्योजकांना आर्थिक मदत करेल व प्रोत्साहित करेल अशी खात्री आहे. कोरोनाच्या महामारीत धाराशिव साखर कारखान्याच्या माध्यमातून देशात पहिला ऑक्सिजन प्रकल्प उभा करणारे *ऑक्सिजन मॅन* चेअरमन अभिजीत पाटील यांच्या माध्यमातून उभा करण्यात आला. त्याचं हि अभिनंदन करतो.

मल्टीस्टेटच्या माध्यमातून अनेक तरूणांना उद्योगाला प्रोत्साहन देऊन उस्मानाबाद सारख्या जिल्ह्यात उद्योगाची नांदी घडविण्यात ही संस्था हातभार लावेल असा विश्वास धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटीलयांनी केला. मल्टीस्टेटच्या सुविधा ATM, NEFT, RTGS, IMPS, QR कोड, मोबाईल बॅकींग, लाॅकर सुविधा अशा अनेक सुविधा दिल्या जाणार आहेत. "आम्ही जपतो सर्वकाही" हे आपले ब्रीदवाक्य ही संस्था सार्थ ठरवते आहे याचा मनस्वी आनंद वाटतो. उत्कृष्ट व पारदर्शक कारभारामुळे जनमानसात आपल्या मल्टीस्टेटने एक अतूट विश्वासाचं नातं निर्माण करेल असा विश्वास वाटतो असे अभिजीत  पाटील म्हणाले 




याप्रसंगी आमदार, नगराध्यक्ष, विविध संस्थेचे चेअरमन, पदाधिका-यांनी नवीन  उदघाटनाप्रसंगी शुभेच्छा दिल्या.उपस्थित मान्यवर उस्मानाबाद नगरीचे नगराध्यक्ष श्री.मकरंद राजेनिंबाळकर, उस्मानाबाद जनता बँकेचे मा.अध्यक्ष श्री.विश्वास शिंदे, ॲड.श्री. व्यंकट गुंड, श्री.दत्ताभाऊ कुलकर्णी, श्री. हनुमंत मडके, श्री.विक्रम पाटील, श्री.सुधीर सस्ते, श्री.प्रदिप खामकर, श्री.अमित शिंदे,.श्री.प्रशांत पाटील, श्री.नागनाथ नागणे, सरपंच श्री. चरणेश्वर पाटील,श्री.सुधाकर रितापुरे, यासह अनेक मल्टीस्टेट संस्थाचे चेअरमन संदेश दोशी, सुरज पाटील धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील, संचालक संतोष कांबळे, सुरेश सावंत, दिनेश शिळ्ळे, दिपक आदमिले, संदीप खारे, आबा खारे, रणजित भोसले, सुहास शिंदे, विकास काळे, सजंय खरात, यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top