यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त आणि लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी
निमित्त अभिवादन.
तुळजापूर:- येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त आणि लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ. अनिल शित्रे सर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले ,पुष्पहार आणि पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या वेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. शिवाजी जेटीथोर, प्रा. प्रमोद मुळे, परीक्षा विभाग प्रमुख डॉ. श्रीरंग लोखंडे, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रो. डॉ. सुरेंद्र मोरे यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
बातमी संकलन :- रूपेश डोलारे , तुळजापूर