लोहारा तालुक्यात पावसाअभावी खरीप पिके ध्योक्यात!

0

लोहारा तालुक्यात पावसाअभावी खरीप पिके ध्योक्यात!


लोहारा (  सुमित झिंगाडे )

लोहारा तालुक्यातील नागुर भातागळी जेवळी कानेगाव यासह लोहारा परिसरात मागील महिनाभरापासून पावसाने दांडी मारल्याने खरीप पिके धोक्यात आली असून शेतकरी हवालदिल झाला आहे, पावसाने उघड दिल्याने खरीप हंगामातील हजारो हेक्टर सोयाबीन, उडीद, तूर,भुईमूग, आदी खरीप पिके सुकून चालली आहेत, पाझर तलाव कोरडे पडत आहेत, विहीर, बोअर वरून शेतकरी आपली पिके वाचवण्यासाठी आटापिटा करीत आहे, रात्रीची लाईट असल्याने सापाच्या भीतीने अनेकांना जीव मुठीत धरून पाणी द्यावे लागत आहे.



मागील महिन्यापूवी चांगला पाऊस झाल्यामुळे खरीप  पिके जोमदार होती त्यामुळे बळीराजा आनंदी होता ,मागील वीस ते पंचवीस दिवसात अतिशय तुरळक प्रमाणात व रिमझिम पाऊस झाला,अनेकांच्या सोयाबीन पिकांवर केसाळ अळी, पाने कुरतडनारी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात किटनाशकाची फवारणी लागली ,पेरणीपूर्व मशागत बीबीयाने ,खते ,पेरणी फवारणी, अंतर मशागत आदी खर्चाने शेतकरी मेंटाकुटीला आला आहे.



बहुतेक शेतकऱ्यांनी विविध बँका कडून व सावकारा पासून कर्ज घेवून वरील सर्व खर्च केला असतो,पावसाअभावी ही पिके करपून जात आहेत,त्यामुळे लोहारा शहरासह परिसरातील शेतकरी अतिशय चिंताग्रस्त झाल्याचं दिसून येत असून येत्या दोन चार दिवसात पाऊस आला नाही तर परिसरातील खरीप हंगाम वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.



14 व 15 ऑगस्ट रोजी जिल्ह्याचे पालक मंत्री शंकरराव गडाख हे उस्मानाबाद जिल्हा दौ-यावर येत आहेत पालकमंत्री शेतकऱ्यांसाठी काय उपाययोजना करतात याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top