3000 हजार रुपये लाच स्वीकारताना खाजगी आरटीओ एजंट लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात ACB OSMANABAD
उस्मानाबाद :- 4500/- रुपये लाच रकमेची मागणी करून यापूर्वी 1500 /-रुपये लाच रक्कम स्वीकारल्याचे मान्य करून , 3000/- रुपये लाच रक्कम स्विकारल्याने दोन खाजगी आर. टी. ओ एजेंट यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग उस्मानाबाद यांनी घेतले ताब्यात
तक्रारदार यांचे भावाचे नावे असलेल्या टाटा मेगा एक्स एल चारचाकी मालवाहू गाडीचे पुनरनोंदणी करून वाहनाचे आरटीओ तपासणीमध्ये मदत करण्यासाठी आरोपी श्री.तानाजी गोकुळ भोगील,39 वर्ष, व्यवसाय -खाजगी आर. टी. ओ.एजेंट, आरटीओ कार्यालया समोर, उस्मानाबाद. यांनी 4500 रुपयांची लाचेची मागणी करून यापूर्वी 1500/- रुपये रक्कम स्विकारल्याचे मान्य करून उर्वरित 3000 रुपये स्वीकारण्याचे मान्य केले आणि श्री.संदिप श्रीनिवास सूर्यवंशी, 28 वर्ष, व्यवसाय- ऑनलाईन सर्व्हिस सेंटर,आरटीओ कार्यालया समोर, उस्मानाबाद. रा. टाकले बेंबळी ता.जी.उस्मनाबाद. यांच्या मार्फतीने 3000/- रुपये लाच रक्कम पंचांसमक्ष स्विकारल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे विरुद्ध पोलीस ठाणे आनंदनगर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
ही कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री.राहुल खाडे , प्रभारी अपर पोलीस अधीक्षक श्री नंदकिशोर क्षीरसागर, ला. प्र.वि.औरंगाबाद, प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक, ला. प्र. वी उस्मानाबाद यांचे मार्गदर्शनाखाली
अशोक हुलगे , पोलीस निरीक्षक, ला. प्र. वी.उस्मानाबाद यांनी केली. याकामी त्यांना पोलीस अंमलदार, मधुकर जाधव, विष्णू बेळे, सिद्धेश्वर तावसकर,अविनाश आचार्य, यांनी मदत केली.
कोणताही शासकीय अधिकारी/कर्मचारी, महाराष्ट्र शासनाचे मानधन, अनुदान घेणारी व्यक्ती, खाजगी व्यक्ती शासकीय कामासाठी अथवा शासकीय काम करून दिल्याबद्दल लाचेची मागणी करत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद येथे सम्पर्क करण्याबाबतचे आवाहन प्रशांत संपते, पो.उप अधीक्षक, ला.प्र.वि. उस्मानाबाद ( मो.नं.९५२७९४३१००) गौरीशंकर पाबळे, पोलीस निरीक्षक, ला. प्रा. वी. उस्मानाबाद ( मो. क्र. 8888813720) अशोक हुलगे, पोलीस निरीक्षक, ला. प्रा. वी. उस्मानाबाद (मो. क्र.8652433397) यांनी केले आहे.