आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या सौजन्याने व अर्चनाताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या श्री महालक्ष्मी देवी आणि श्री ज्योतिबा धार्मिक दर्शन सहल..

0

आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या सौजन्याने व अर्चनाताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या श्री महालक्ष्मी देवी आणि श्री ज्योतिबा धार्मिक दर्शन सहलीत महिलांनी लुटला मनमुराद आनंद !!

धाराशिव : भल्या पहाटे महिलांच्या प्रचंड उत्साहात व मोठ्या संख्येतील ट्रिप सुरू झाली आणि प्रत्येक महिलेने या ट्रिपचा मनमुराद आनंद लुटला. इतकया मोठ्या संख्येने महिला ट्रीपला पहिल्यांदाच निघाल्या होत्या. त्यामुळे त्या स्वतः सुद्धा साशंक होत्या. मार्गशीर्ष महिन्या निमित्त आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या सौजन्याने आणि जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी प्रमाणे यावर्षीही महिलांसाठी श्री महालक्ष्मी देवी आणि श्री ज्योतिबा देवस्थान धार्मिक दर्शन सहल आयोजित करण्यात आली होती.

सदरील दर्शन सहल मंगळवार दि.१९ रोजी प्रतिष्ठान भवन, धाराशिव येथून पहाटे निघाली होती रात्रीपर्यंत या महिलांनी या सहलीचा आनंद लुटला. धाराशिव शहरातील छत्रपति शिवाजी महाराज पुतळ्यास अभिवादन करून सहलीची सुरुवात झाली. यावेळी धाराशिव तालुक्यातील प्रमुख पदाधीकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मार्गशीर्ष महिन्यानिमित्त यावेळी धाराशिव तालुक्यातील महिलांना महाराष्ट्रातील साडेतीन पीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवी मंदिर तीर्थक्षेत्र कोल्हापूर येथे तसेच श्री जोतिबा देवस्थान येथे दर्शनाची संधी उपलब्ध करून दिली होती. तालुक्यातील तेर, येडशी, ढोकी, पळसप, कोंड, पाडोळी (आ), केशेगाव, बेंबळी, सांजा, वडगांव (सि), आंबेजवळगा, उपळा या जिल्हा परिषद गटास एक बस या प्रमाणे १२ व सीआरपी, आशा वर्कर्स, आदींसाठी १ बस या प्रमाणे १३ बसेसची सोय करण्यात आली आहे. मात्र या सहलीस येण्यासाठी सौ.अर्चनाताई पाटील यांनी महिलांना येण्यासाठी केलेल्या आवाहनामुळे नोंदणी पेक्षा महिलांची संख्या वाढली. त्यामुळे ऐन वेळी २ लहान बसेस ची सोय करण्यात आली. अश्या एकूण १५ बसेस मधून महिलांची ट्रिप संपन्न झाली.  


श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन झाल्यानंतर शेकडो महिलांसह नजीकचे जागृत देवस्थान असलेल्या श्री ज्योतिबाचे दर्शन घेतले. तसेच येथील कणेरी मठास भेट दिल्याने व प्रसिद्ध संग्रहालय पाहण्याची संधी मिळाल्याने महिलांचा आनंद द्विगुणित झाला.


या धार्मिक दर्शन सहली निमित्त महिलांशी हितगुज करताना मा. सौ. अर्चनाताई पाटील म्हणाल्या की, देवदर्शन एक निमित्त आहे, देवदर्शन आपण आपल्या गावात सुद्धा करू शकतो. पण महिलांना कधीही घराच्या बाहेर पडून स्वतःसाठी आनंद घेता येत नाही. त्यामुळे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून मी दरवर्षी अशा सहलीचे नियोजन करते. आणि त्यानंतर महिलांमधून ज्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया येतात, त्या जो आनंद घेतात, त्यामुळे माझा स्वतःचा आनंद द्विगुणीत होऊन पुन्हा पुन्हा अशा सहलीचे नियोजन करावे असे माझ्या मनामध्ये सतत येत राहते. यंदाच्या  या ट्रीपला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आम्ही स्वतः सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात महिला घेतल्यामुळे सांशक होतो की महिला कसा प्रतिसाद देतील, परंतु महिलांनी इतका सुंदर या सहलीचा आनंद लुटला कुठल्याही प्रकारे गालबोट न लागता निर्विघ्नपणे महिलांना सुखरूप घरी सोडल्याचे माझ्या मनामध्ये समाधान आहे. यावेळी महिलांनी देवीची गाणी गेली.  श्रावणमास निमित्त देखीलअशीच धार्मिक यात्रा तुळजापूर तालुक्यातील महिलांसाठी श्री ज्योतिर्लिंग भीमाशंकर दर्शन सहल आणि कळंब तालुक्यातील महिलांसाठी श्री घृष्णेश्वर दर्शन सहल काढण्यात आली होती. त्यालाही असाच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.

या सहलीमध्ये सहभागी झालेल्या महिलांनीही आ.राणादादा आणि सौ. अर्चनाताई च्या माध्यमातून आपल्याला दर्शन सहलीचा पहिल्यांदाच आनंद घेता आला व आपण सहल कशी असते हे पाहिल्याचे जाणीवपूर्वक नमूद केले. यावेळी श्री महालक्ष्मी देवी आणि श्री ज्योतिबा देवस्थान प्रशासनाच्या वतीने मा.सौ. अर्चनाताई पाटील यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top