जिल्हाधिकारी डॉ.ओम्बासे २१ डिसेंबर रोजी मराठा संघटनांसोबत संवाद साधणार
धाराशिव,दि.20 राज्याचे मुख्य सचिव यांच्या निर्देशानुसार उद्या 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे हे मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर इंपेरीकल डेटा गोळा करण्यासंदर्भात जिल्हयातील सर्व मराठा संघटनाच्या पदाधिकाऱ्यांशी या बैठकीत संवाद साधणार आहेत.
इंपेरीकल डेटा व इतर माहिती संकलीत करण्याबाबत बैठकीत संवाद साधणार आहेत.तरी सर्व मराठा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या बैठकीस उपस्थित राहावे.असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी केले आहे.