google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 4 हजार रुपये लाचेची मागणी करुन 4 हजार रुपये स्वीकारताना सहाय्यक फौजदार अँटी करप्शन च्या जाळ्यात ACB Osmanabad Action at Tuljapur

4 हजार रुपये लाचेची मागणी करुन 4 हजार रुपये स्वीकारताना सहाय्यक फौजदार अँटी करप्शन च्या जाळ्यात ACB Osmanabad Action at Tuljapur

0

4 हजार रुपये लाचेची मागणी करुन 4 हजार रुपये स्वीकारताना सहाय्यक फौजदार अँटी करप्शन च्या जाळ्यात 
                                
उस्मानाबाद :- जिल्ह्यातील तामलवाडी येथे तक्रारदार , त्यांचे भाऊ व वडील यांचे विरूद्ध पोलिस स्टेशन तामलवाडी ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद येथे दाखल असलेल्या अदखलपात्र गुन्ह्य क्र.252/2021 मध्ये  तक्रारदार त्यांचा भाऊ व वडिल कारवाई न करण्यासाठी यातील अलोसे यांनी 4000/रुपयांची मागणी करून 4000/रूपये स्वीकारण्याचे मान्य केले व पांचासमक्ष 4000/ रूपये श्री गोकुळ बाबुराव गिरी,वय 58,सहा.पोलिस उपनरीक्षक,पो. स्टे. तामलवाडी ता. तुळजापूर, जी उस्मानाबाद. ह.मु.आयोध्या नगर, तुळजापूर. यांनी स्वीकारले असता  उस्मानाबाद अँटी करप्शन विभागाने ताब्यात घेतले आहे.

हि कारवाई श्री अशोक हुलगे , पोलीस निरीक्षक, ला प्र वि उस्मानाबाद यांनी मा. डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद , मा.श्री रुपचंद वाघमारे--प्रभारी अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र. वि. औरंगाबाद , मा. प्रशांत संपते  -- पोलीस उप अधीक्षक ला.प्र.वि. उस्मानाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली केली 
 
या कारवाई पोलीस अंमलदार अर्जुन मार्कड, मधुकर जाधव, शिद्धेस्वर तावसकर, चालक दत्तात्रय करडे. यांनी पुर्ण केली आहे .

लाचे संबंधी तक्रार असल्यास खालील नंबर वर संपर्क साधावा
टोल फ्री क्र:-1064
दूरध्वनी क्र:-02472/222879

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top