मावळत्या पोलीस अधीक्षकांचा भावपुर्ण निरोप समारंभ संपन्न

0




मावळत्या पोलीस अधीक्षकांचा भावपुर्ण निरोप समारंभ संपन्न.

पोलीस मुख्यालय : उस्मानाबाद जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. श्री. राज तिलक रौशन यांची बृहनमुंबई पोलीस आयुक्तालयात बदली झाली असल्याने आज दि. 21 सप्टेंबर रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात त्यांचा सहकुटूंब निरोप समारंभ आयोजित करण्यात आला. या प्रसंगी जिल्हा पोलीस दलातील अधिकारी- अंमलदार, मंत्रालयीन कर्मचारी हजर होते. पोलीस दलाच्या वतीने उस्मानाबाद विभागाचे पोलीस उपअधीक्षक श्री. मोतीचंद राठोड यांनी पोलीस अधीक्षक सो. यांना पुष्पगुच्छ, शाल श्रीफळ देउन सन्मानीत केले. या प्रसंगी उपस्थित पोलीस अधिकारी- अंमलदार यांनी मा. पोलीस अधीक्षकांना कार्यालयातून रवाना करतांना फुलांनी सजवलेल्या त्यांच्या वाहनास ओढत नेउन निरोप देण्याची पोलीस दलातील परंपरा जोपासली. या भावपूर्ण कार्यक्रमादरमयान पोलीस अधीक्षक श्री. राज तिलक रौशन यांचे डोळे पानावले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top