वंचित बहुजन आघाडीचे निलेश नाईकवाडी, इम्रान पठाण यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश.
उस्मानाबाद :- जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील शिराढोन येथील वंचित बहुजन आघाडीचे निलेश नाईकवाडी, इम्रान पठाण यांच्या आनेक सहकाऱ्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या ज्वलंत भगव्या विचारांना प्रेरित होऊन, शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री मा.ना उद्धवजी ठाकरे साहेब व युवासेना प्रमुख तथा राजशिष्टाचार व पर्यावरण मंत्री मा.ना.आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या नेतूत्वावर विश्वास ठेवून शिवसेना संपर्कप्रमुख प्रा.आ.तानाजीराव सावंत साहेब, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण मंत्री मा.ना.शंकरराव गडाख-पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिराढोण ता.कळंब येथिल वंचित बहुजन आघाडीचे निलेश नाईकवाडी, इम्रान पठाण यांच्या नेतृत्वाखाली आदी सहकाऱ्यांचा शिवसेना पक्षात खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर , आमदार कैलास-घाडगे पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. यावेळी सर्वांचा सत्कार करून स्वागत करण्यात आले.
यावेळी पं.स.राजेश्वर बप्पा पाटील, ग्रा.पं. सदस्य नासीर पठाण, नितीन पाटील, युवासेना शहरप्रमुख अवधूत पाटील, विनोद नानजकर, पिंटू पठाण, रणजित गवळी, दिलीप पाणढवळे, दगडू पाटील, नितीन विजय पाटील, बिभीषण कणसे, सुनिल पाणढवळे, सयाजी कणसे तसेच आदी पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.