सार्वजनिक गणेशोत्सव 2021 निमीत्त मा.पोलीस अधीक्षकांचे जनतेस आवाहन
उमरगा पोलीस ठाणे : कोरोना साथीच्या पार्श्वभुमीवर दि. 10 ते 19 सप्टेंबर 2021 या काळात गणेशोत्सव साजरा होत असून महाराष्ट्र शासनाच्या दि. 29.06.2021 रोजी व दि. 08.09.2021 रोजीच्या परिपत्रकान्वये सार्वजनिक गणेश उत्सवासंबंधी मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आल्या आहेत. या सुचनांचे तसेच कोरोना संबंधी मनाई आदेशांचे पालन व्हावे, जनजागृती व्हावी या उद्देशाने उमरगा पोलीस ठाण्यामार्फत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची व शांतता समितीची बैठक आज दि. 08 सप्टेंबर रोजी उमरगा येथे आयोजीत करण्यात आली होती. कोरोना मनाई आदेशांचे पालन करुन सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन याप्रसंगी मा. पोलीस अधीक्षक श्री. राज तिलक रौशन यांनी जनतेस केले आहे.