मुस्लिम पंचकमिटी व मुस्लिम समाजा तर्फे मा. बापुरावजी (काका ) पाटील साहेब यांचा सत्कार संपन्न
उमरगा (महादेव पाटील)
मा .श्री बापुरावजी पाटील यांची निवड श्री क्षेत्र श्रीशैलम येथील जगद्गुरू पिठाच्या ट्रस्ट वर उस्मानाबाद जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष व नगर विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.बापुरावजी पाटील संचालक म्हणून निवड झाल्याबद्दल मुरूम येथे मुस्लिम समाजा तर्फे सत्कार करण्यात आला. मा. बापुरावजी पाटील हे सर्व समाजाला सोबत घेऊन समाजकारण व राजकारणात समर्थपणे वाटचाल करीत आहेत. तसेच सर्व समाजामध्ये या निवडीमुळे आनंद व्यक्त होत आहे. यावेळी मुस्लिम पंच कमिटीचे अध्यक्ष बाबासाहब औटी, सचिव आलिमभाई बिजापूरे , नगरसेवक आतीकजी मुंशी, जिल्हा अल्पसंख्यांक सेलचे उपाध्यक्ष प्रा . डॉ. शौकत पटेल, अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष याकूबभाई नदाफ, हिंदुस्तान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कलीम पठाण साहब व आयुबजी जमादार, जावेद शेख, महेताब शेख, खालिद शेख, मुस्लिम समाजाचे अनेक प्रतिनिधी उपस्थित होते.