तहसील कार्यालय आवारातील चोरीस गेलेल्या ट्रकसह आरोपी दुसऱ्या दिवशी अटकेत.”
परंडा पोलीस ठाणे : आंदोरी, ता. परंडा येथील आश्रु राजेंद्र बारस्कर यांचा ट्रक क्र. एम.एच. 12 एफझेड 3450 हा खासगांव येथील नदी पात्रातून 3 ब्रास वाळू अवैध वाळू वाहतूक करत असतांना दि. 02.02.2018 रोजी महसूल विभागाने जप्त करुन परंडा तहसील कार्यालयाच्या आवारात लावला होता. तो ट्रक दि. 27 सप्टेंबर च्या पहाटे अज्ञाताने चोरुन नेला होता. याप्रकरणी खासापुरीचे कोतवाल- सतीष कांबळे यांच्या प्रथम खबरेवरुन परंडा पो.ठा. येथे भा.दं.सं. कलम- 379 नुसार गुन्हा नोंद क्र. 324 / 2021 दाखल करण्यात आला.
परंडा पो.ठा. च्या पोनि- श्री. सुनिल गीड्डे यांसह , सपोनि- श्री. हींगे, पोहेकॉ- दिलीप पवार, पोना- किरण हावळे, पोकॉ- अजीत कवडे, यादव यांच्या पथकाने गोपनीय माहिती घेतली असता त्या ट्रकचे मालक आश्रु बारस्कर यांचा या चोरीमागे हात असावा. असा पोलीसांचा संशय बळावल्याने पथकाने त्यास आज दि. 28 सप्टेंबर रोजी ताब्यात घेतले. नमूद ट्रक विषयी विचारले असता सुरुवातीला त्याने साळसुदपनाचा आव आणण्याचा प्रयत्न केला. परंतू पोलीसांच्या भडीमारासमोर तो जास्त काळ टिकाव धरू शकला नाही. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे नमूद ट्रक पोलीसांनी जप्त केला असून उर्वरीत तपास सुरू आहे