उस्मानाबाद शहरातील ओम नगर येथील गणेश मंडळ घेत आहे नागरिकांच्या आरोग्याची काळजी
(सर्व समाज घटकांचे हित जपणाऱ्या गणेश मंडळाचा विविध समाज माध्यमांद्वारे सत्कार)
उस्मानाबाद - शहरातील ओम नगर या भागात अनेक वर्षांपासून विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभामंडपामध्ये 'ओम नगरचा राजा' या नावाने गणपती बसवला जातो, दरवर्षी या गणेश मंडळामार्फत विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबवले जातात याही वर्षी विवेकानंद युवा मंडळ संचलित ओम नगरचा राजा गणेश मंडळाचे एक वैशिष्ट्यपूर्ण नियोजन येथील नागरिक व रहिवाशांना भावत आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डेंग्यू, मलेरिया या आजारांचे सावट असून त्यापासून येथील नागरिकांना सुरक्षित राहण्यासाठी संपूर्ण ओम नगर मध्ये जंतूनाशक फवारणी मंडळामार्फत करण्यात आली आहे. त्याचबरोबर इतरही दिवशी विविध बालसंस्कारी व ज्येष्ठ नागरिकांनी दर्शवलेले कार्यक्रम मंडळ राबवत आहे. यामध्ये ओम नगर मध्ये असलेल्या महिला भजनी मंडळाचा सत्कार, दशकपूर्ती कडे वाटचाल करणाऱ्या श्री सिद्धेश्वर महिला बचत गटाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार, मंदिराचे नियोजन बघणार्या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, गणेशोत्सवाचा अनावश्यक खर्च टाळून विसर्जनाच्या दिवशी महाप्रसादाचे वाटप, लहान शालेय मुलांना साहित्य वाटप, लहान मुलांच्या विविध स्पर्धा आणि कार्यक्रम राबवून सर्वांच्या पसंतीस मंडळ पात्र ठरत आहे.
पोलीस स्टेशन मार्फतदेखील मंडळाचा शांतता कमिटीच्या सभेमध्ये सत्कार करण्यात आला.
येत्या नवरात्र महोत्सवा मध्ये देखील खास महिलांसाठी विविध कार्यक्रम व स्पर्धा राबविण्यात येणार असल्याचे नियोजन विवेकानंद युवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बाळकृष्ण साळुंके यांनी सांगितले. मंडळाचे गणेशोत्सवाचे संपूर्णपणे नियोजन बघणार्या टीमचे त्यामध्ये अनिकेत माने छावा, शुभम पडवळ, राहुल काळे, वैभव चंदने, शिवरत्न नलावडे, पृथ्वीराज झालटे, अंबिका हॉटेलचे सुरत जवळगे, सागर माळी, बालाजी माने, वैभव कुलकर्णी, प्रतिक मगर, सुमित जानराव, कौशिक डांगे, रोहित पाटील या सर्वांसह आदींचे सर्व स्तरांमधून कौतुक होत आहे.