ऊस उत्पादक शेतकरीसाठी कारखाना आपल्या दारी उपक्रम-शरण पाटील

0

ऊस उत्पादक शेतकरीसाठी कारखाना आपल्या दारी उपक्रम-शरण पाटील

संघर्षतुन मार्ग कडून कारखाने नावलौकिक मिळवलं

उमरगा प्रतिनिधी 

निसर्गाचा असमतोल, ऊस गाळप व ऊस संगोपनाचा खर्च पाहता ऊस उत्पादक शेतक-यांनी कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न घेतल्यास एकरी ऊसाचे टनेज वाढण्यास मदत होईल व त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा शेतक-यांना होऊ शकतो त्यामुळे काळाची गरज ओळखून शेतक-यांनी कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न देणा-या ऊस जातीची लागवड करावी, सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस श्री विठ्ठलसाई गाळप  करणार आसे आवाहन जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते शरण पाटील यांनी केले.

श्री विठ्ठलसाई साखर कारखान्यातर्फे तुरोरी येथे ऊस परिषद शेतकरी संवादाचे आयोजन मंगळवारी संध्याकाळी (दि.२९) करण्यात आले होते. जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते शरण पाटील पुढे म्हणाले की, सहकार साखर कारखाना चळवळ आपण सर्वानीच सुरळीतपणे सुरु ठेवली आहे. भरपुर अशी संकटे आपल्‍यावर आली तरीही या संकटांवर मात करण्‍यासाठी कामगार, शेतकरी बांधव यांचे मोठे सहकार्य मिळाल्‍यामुळेच कारखान्‍याची वाटचाल चांगल्‍या पध्‍दतीने सुरु असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. कर्मचारी कडून चुक झाली आसली तर माफी मागतो. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून कारखान्याचे संचालक बापुराव पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आण्णाराव शिंदे होते. यावेळी प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव दिलीप भालेराव, जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे,जिप सदस्य रफिक तांबोळी , कुमार पवार,उमेश ममाळे,चंद्रशेखर पवार, बसवराज कस्तुरे, कार्यकारी संचालक एम बी अथणी, सरपंच मयुरी जाधव,उमरगा पंसचे सभापती सचिन पाटील,  माजी उपसभापती युवराज जाधव, गोविंद पाटील, शौकत पटेल, शाहूराज भोसले,  महालिंग बाबशेट्टी, प्रताप पाटील,राहुल वाघ, योगेश राठोड, दत्ता चटगे,पंडित शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कारखान्याचे संचालक बापुराव पाटील यांनी शेतकऱ्यांसोबत थेट संवाद साधून हंगामाचे काळात येणाऱ्या अडचणी, ऊस तोडणी प्रोग्रॅम, लेबर व वाहनांच्या समस्येबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी , दाबका, मुरळी, आष्टा जहांगीर, कुन्हाळी, मळगीवाडी आदी गावातील ऊस उत्पादक शेतकरी उपस्थिती होते.यावेळी मनोगत मयुरी जाधव, शौकत पटेल, आण्णाराव शिंदे मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऊसपुरवठा अधिकारी व्यंकट बलसुरे, सुत्रसंचलन अमित रेड्डी व आभार सुभाष जाधव  यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top