परंडा तालुक्यातील कार्ला ते मुगांव रस्ताची दुरावस्था..

0

परंडा तालुक्यातील कार्ला ते मुगांव रस्ताची दुरावस्था..

 ( बातमी संकलन :-  विजय शेवाळे , पंरडा )

उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील कार्ला ते मुगांव रस्ताची दुरावस्था झाली आहे. कार्ला हे गावाची लोकसंख्या 1900  इतकी असुन येथील नागरिक परांडा, सोनारी व अनाळा येथील दवाखाना , बॅंक तसेच विद्युत कामा साठी दळणवळण करत  असतात . मात्र या रस्त्याने ये जा करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.केवळ दोन किलोमीटर  अंतर असलेल्या या रस्त्याने चालणे देखील कठीण झाले आहे . या रस्त्यावर लहान मोठे खड्डे पडल्यामुळे वाहन चालवताना वाहन चालकांना अनेक व्याधीचा या खराब रस्त्यामुळे सामना करावा लागत आहे .तरी संबंधित विभागाने लवकरात लवकर रस्ता दुरूस्त करावा अशी मागणी तेथील नागरिकांनी केली आहे. 


रस्ता फारच खराब झाल्यामुळे  नागरिकांना खराब रस्त्यामुळे होणाऱ्या व्याधींचा सामना करावा लागत आहे यामुळे मणक्याचे आजार मोठ्या प्रमाणावर उद्भवत आहेत . त्याच बरोबर  गरोदर महिला, आजारी माणसांना आनाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जावे लागते . परंतु नादुरुस्त रस्त्या मुळे गरोदर महिलांना याचा त्रास सहन करावा लागत आहे तरी लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी तेथील नागरिकांनी बातमी संकलन करता केली आहे.


"रस्ता खराब असल्यामुळे वाहने आमच्या गावात येत नसल्यामुळे आम्हाला दळणवळणासाठी विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे तरी प्रशासनाने दखल घेउन रस्ता लवकरात लवकर दुरूस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top