जि.प.च्या अनुकंपा भरतीतील उमेदवारांची 16 सप्टेंबरला कागदपत्र पडताळणी*
उस्मानाबाद,दि.8,(जिमाका):- जिल्हा परिषद उस्मानाबाद येथील अनुकंपा भरती प्रक्रियेबाबत कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी 16 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह,जिल्हा परिषद उस्मानाबाद येथे कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे. 11 सप्टेंबर 2019 च्या शासन निर्णयनुसार अपुकंपाधारक उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. याबाबतची ज्येष्ठता यादी www.zposmanabad.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी यादीतील 01 ते 80 पर्यंतच्या उमेदवारांनी मूळ कागदपत्रांसह 16 सप्टेंबर रोजी वेळेवर उपस्थित राहावे.ज्यांनी मूळ कागदपत्रे सादर केलेले आहेत त्यांनी त्यांच्या सत्यप्रतीसह उपस्थित राहावे,अनुऊपस्थित उमेदवारांचा नियुक्तीचा विचार केला जाणार नाही. अर्जात नमूद केलेल्या पत्यावरून पत्र प्राप्त करून घ्यावे,असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.
****