हकालपट्टी : उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षातून 13 नगरसेवकांना सहा वर्षासाठी निलंबित!
उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या वारंवार पक्षाच्या बैठकीत गैरहजर राहिल्यामुळे 30 ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत निर्णय घेऊन सहा वर्षासाठी खालील नगरसेवकांना निलंबित करण्यात आले आहे
2019 विधानसभा पासून वारंवार पक्ष विरोधात काम करत असल्यामुळे व पक्षाच्या 2019 पासून कोणत्याही बैठकीस हजर न राहिल्यामुळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले नगरसेवक यांना पक्ष जिल्हा निरीक्षक श्री.रमेश बारस्कर यांच्या बैठकीस माजी आमदार राहुल मोटे,ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे, जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार व जिल्हा कार्याध्यक्ष संजय दुधगावकर, प्रदेश चिटणीस सुरेश पाटील यांच्या उपस्थितीत दिनांक 30/ 10 /20 21 रोजी च्या शहर व तालुका पदाधिकारी यांच्या बैठकीच्या चर्चेनुसार निर्णय घेऊन सहा वर्षासाठी खालील सदस्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
१)विनोद पिंटू गंगणे,
२)अर्चना विनोद गंगणे माजी नगराध्यक्षा ,
३)हेमा औदुंबर कदम नगरसेविका,
४)पंडितराव देवीचं जगदाळे नगरसेवक,
५) मंजुषा प्रसाद देशमाने नगरसेविका,
६) किशोर बाबुराव साठे नगरसेवक,
७)आशाताई विनोद पलंगे नगरसेविका,
८)विजय राजेंद्र कंदले नगरसेवक,
९)रेशमा अविनाश गंगणे नगरसेविका,
१०)सचिन न्यानोबा रोचकरी नगराध्यक्ष,
११) वैशाली तानाजी कदम नगरसेविका ,
१२)भारतीताई नारायण गवळी नगरसेविका,
१३)अश्विनी विशाल रोचकरी नगरसेविका, या वरील सदस्यांना राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मधून सहा वर्षाकरिता निलंबित करण्यात येत आहे.
अशी माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे सोबत प्रसिद्धीपत्रक जोडण्यात आले आहे