उस्मानाबाद जिल्ह्यातील पुरग्रस्तांना अन्न धान्याची तातडीने मदत करण्याबाबत वंचित आघाडीची मागणी
उस्मानाबाद :- दि 3 , (प्रतिनिधी ) वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा टिमने नुकताच उस्मानाबाद तालुक्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला . त्यामध्ये तेर, इर्ला, दाऊतपुर , रामवाडी या गावात पाणी शिरल्याने अन्नधान्याचे मोठे नुकसान झाले असून अन्नधान्य वाहून गेले आहे .त्यामुळे सद्यस्थितीत त्यांच्या खाण्यापिण्याचा प्रश्न उभा असल्याने त्यांना तात्काळ मदतीची आवश्यकता आहे . शासनानेही मदतीचे आश्वासन दिले असले तरी ती मदत येण्यापूर्वी त्या गावातील पूरग्रस्तांना पुरवठा विभागाकडून किमान 25 किलो तांदूळ 25 किलो गहू तातडीने वितरित करण्यात यावे .अशी मागणी जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे . या निवेदनावर महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा एडवोकेट जिनत प्रधान, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष दिलिप आडे, जिल्हा महासचिव बाबासाहेब जानराव ,जिल्हा संघटक सुजाता बनसोडे, कोषाध्यक्ष रुक्मीन बनसोडे , प्रवक्ते के.टी. गायकवाड सोमनाथ टिळक , विजय बनसोडे , विद्या वाघमारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.