विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा उद्या दौरा
उस्मानाबाद,दि.03(जिमाका) :- महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे उद्या दि.4 ऑक्टोबर 2021 रोजी उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम असा श्री फडणवीस यांचे मोटारीने उजनी (ता. औसा) मार्ग करजखेड (ता.उस्मानाबाद) येथे दुपारी 2 वाजता आगमन होईल. आणि त्यांचा वेळ राखीव असेल. दाऊतपूर, इर्ला (बेबंळी- चिकली मार्ग) ता. उस्मानाबादकडे मोटारीने प्रयाण करतील. दाऊतपूर आणि इर्ला येथे (बेबंळी- चिखली मार्ग) ता. उस्मानाबाद येथे आगमन आणि अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी व भेट. सांयकाळी 4:50 वाजता मोटारीने आवड शिरपूरा (ता कळंब)कडे प्रयाण. सांयकाळी 5:20 वाजता आवड शिरपूर (ता कळंब) येथे आगमन व अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी व भेट. सोईनुसार मोटारीने मुंबईकडे प्रयाण करतील.
****