जात पंचायतीच्या जाचामुळे बळीप्रकरणी ७ आरोपी डिकसळ आणि ढोकी शिवारातून अटकेत; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

0

जात पंचायतीच्या जाचामुळे बळीप्रकरणी ७ आरोपी डिकसळ आणि ढोकी शिवारातून अटकेत; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी


स्थानिक गुन्हे शाखा उस्मानाबाद : आनंदनगर पो.ठा. येथे गु.र.क्र. 275 / 2021 हा भा.दं.सं. कलम- 306, 354, 297, 268, 323, 504, 506, 34 सह महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार पासुन व्यक्तींचे संरक्षण अधिनियम कलम- 5, 6, 7 अंतर्गत दि. 06 ऑक्टोबर रोजी दाखल आहे. नमूद गुन्ह्यातील आरोपींचा पोलीस शोध घेत असून गुन्ह्यातील अरोपी- 1)वसंत छगन काळे 2) संतोष वसंत काळे उर्फ बप्पा 3) नामदेव वसंत काळे, तीघे रा. डिकसळ, ता. कळंब 4)शहाजी राजेंद्र पवार 5) संजय कालिदास काळे 6) बजरंग मोतीराम चव्हाण 7) बप्पा मोतीराम चव्हाण, चौघे रा. दत्तनगर, ढोकी यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज दि. 10 ऑक्टोबर रोजी डिकसळ व ढोकी शिवारातून अटक केली असून पुढील कार्यवाहिस्तव आनंदनगर पो.ठा. च्या ताब्यात दिले असून गुन्ह्यातील त्यांच्या अन्य साथिदारांचा पोलीस शोध घेत आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top