google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 उस्मानाबाद जिल्ह्यात तीन ठिकाणी चोरी , दोन ठिकाणी अपघात , तीन ठिकाणी मारहाण गुन्हे दाखल

उस्मानाबाद जिल्ह्यात तीन ठिकाणी चोरी , दोन ठिकाणी अपघात , तीन ठिकाणी मारहाण गुन्हे दाखल

0



उस्मानाबाद जिल्ह्यात तीन ठिकाणी चोरी , दोन ठिकाणी अपघात , तीन ठिकाणी मारहाण गुन्हे दाखल 


चोरी.

तुळजापूर पोलीस ठाणे : अक्षय अशोक पेंदे, रा.शुक्रवार पेठ, तुळजापूर हे दि. 09 ऑक्टोर रोजी रात्री घराचा दरवाजा उघडा ठेउन झोपले असतांना अज्ञात व्यक्तीने 03.00 वा. सु. घरात प्रवेश करुन आतील 7 स्मार्टफोन चोरुन नेले. अशा मजकुराच्या अक्षय पेंदे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

उमरगा पोलीस ठाणे : जितेंद्र अंकुश, रा. उमरगा यांनी त्यांची हिरो होंडा पॅशन प्रो. मोटारसायकल क्र. एम.एच. 26 एबी 5559 ही दि. 08 ऑक्टोबर रोजी 09.00 ते 17.00 वा. दरम्यान उमरगा बसस्थानक परिसरात लावली असता अज्ञाताने ती चोरुन नेली. यावरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद (ग्रा.) पोलीस ठाणे : गोविंद देशमुख, रा. पोहनेर, ता. उस्मानाबाद यांनी त्यांची होंडा युनिकॉर्न मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एजी 7884 ही दि. 05 ऑक्टोर रोजी 23.00 वा. आपल्या घरासमोर लावली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ती लावल्या जागी न आढळल्याने अज्ञाताने ती चोरुन नेली आहे. यावरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

 “अपघात.

आनंदनगर पोलीस ठाणे : शिवाजी नरसिंग मुंडे, वय 65 वर्षे, रा. कोटगल्ली, उस्मानाबाद हे दि. 07 ऑक्टोबर रोजी 08.30 वा. सु. उस्मानाबाद शहरातील रस्त्याने पायी जात होते. दरम्यान अज्ञात वाहनाने पाठीमागून येउन दिलेल्या धडकेत ते गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर अज्ञात वाहनाचा अज्ञात चालक जखमीस वैद्यकीय उपचारकामी नेता, अपघाताची खबर नजीकच्या पोलीस ठाण्यास न देता अपघातस्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या शिवाजी मुंडे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 134, 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

नळदुर्ग पोलीस ठाणे : श्रीनिवास माणिक कुलकर्णी, वय 74 वर्षे, रा. नळदुर्ग हे दि. 29.09.2021 रोजी 18.00 वा. सु. व्होर्टी येथील चिकुद्रा- नळदुर्ग रस्त्याने मोटारसायकल क्र. एम.एच. 12 जीएम 8735 ही चालवत जात होते. दरम्यान अज्ञात चालकाने मो.सा. कलम- एम.एच. 14 एफ डब्ल्यु 1105 ही निष्काळजीपने चालवून श्रीनिवास कुलकर्णी यांच्या मो.सा. ला समोरुन धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या सचिन श्रीनिवास कुलकर्णी यांनी दि. 09 ऑक्टोबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

मारहान.

उस्मानाबाद (ग्रा.) पोलीस ठाणे : विशाल मत्स्य व्यवसाय संस्थेकडे घाटंग्री येथील तलावाचा ठेका नमूद संथेकडे असून सहदेव प्रभु हराळे, रा. घाटंग्री, ता. उस्मानाबाद हे त्या संस्थेचे कायदेशीर सल्लागार आहेत. अंबेजवळगा तांडा येथील हरीश्चंद्र राठोड, मनोज राठोड, संजय राठोड यांसह अन्य दहा लोक असे दि. 9 ऑक्टोबर रोजी 06.30 वा. सु. नमूद तलावावर मासे धरत होते. यावेळी सहदेव हराळे यांनी त्यांना जाब विचारला असता नमूद लोकांनी हराळे यांना ठार मारण्याच्या उद्देशाने तलावाच्या सांडव्याच्या पाण्यात ढकलून देउन कोयता, दगडाने मारहान करुन त्यांना गंभीर जखमी केले. तसेच मासे धरण्याचे जाळे तोडून आर्थिक नुकसान केले. अशा मजकुराच्या सहदेव हराळे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 307, 427, 143, 147, 148, 149 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

परंडा पोलीस ठाणे : अजिनाथ अंगद राउत, रा. जवळा (नि.), ता. परंडा हे दि. 06 ऑक्टोबर रोजी 17.30 वा. सु. आपल्या घरात होते. यावेळी नातेवाईक- बालीका बनसोडे, राणी अहिरे, अश्वकुमार अहिरे, ऐश्वर्या अहिरे, विनोद अहिरे, शितल पगारे, मनोज पगारे अशा सात व्यक्तींनी कौटुंबीक भांडणाच्या कारणावरुन अजिनाथ राउत यांच्या घरात घुसून साहित्यांची तोडफोड केली. तसेच राउत यांना ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या गळ्याला दाव्याने फास लावून ठार मारण्याची धमकी दिली. यावेळी राउत यांचे आई- वडील त्यांच्या बचावास आले असता त्यांनाही नमूद लोकांनी मारहान केली. अशा मजकुराच्या अजिनाथ राउत यांनी दि. 09 ऑक्टोबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 307, 452, 427, 323, 504, 506, 507, 143, 147, 149 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

उमरगा पोलीस ठाणे : व्यंकट प्रकाश नागदे, रा. कराळी, ता. उमरगा हे दि. 08 ऑक्टोबर रोजी 01.30 वा. सु. कराळी शिवारातील त्यांच्या तुळजाई हॉटेलात होते. यावेळी गावकरी- अमोल जमादार, करण पाटील, विशाल आष्टे, कैलास चव्हाण अशा चौघांनी तेथे येउन पुर्वीच्या वादावरून व्यंकट नागदे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान केली तर कैलास चव्हाण यांनी हंटरने मारहान करुन नागदे यांना जखमी करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या व्यंकट नागदे यांनी दि. 09 ऑक्टोबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 452, 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top