ऑक्सिजन प्लॅन्ट चे उद्घाटन भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर साहेब यांच्या हस्ते संपन्न

0

उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे ऑक्सिजन प्लॅन्ट चे उद्घाटन भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर साहेब यांच्या हस्ते संपन्न
परंडा :- 
उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे ऑक्सिजन प्लॅन्ट चे उद्घाटन भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी देशाचं कनखर नेतृत्व पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी हे व्हर्च्यवली उपस्थित होते. पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या मुख्यमंत्री ते पंतप्रधान पदाच्या कार्यकाळास 20 वर्षे पूर्ण होत आहेत, यानिमित्ताने परंडा उपजिल्हा रुग्णालयातील 200 LPM (liter per minute) इतक्या क्षमतेच्या ऑक्सिजन प्लॅन्ट चे उद्घाटन झाले. सदरील प्लॅन्ट हा हवेतुन ऑक्सिजन तयार करून प्रती मिनिटं 200 ते 500 लिटर ऑक्सिजन पुरवठा केला जाणार आहे. यामुळे परंडा तालुक्यातील जनतेला कोवीड व इतर रुग्णांना याचा फायदा होणार आहे. यावेळी परंडा तहसीलदार श्री. रेणुकादास देवणीकर, डॉ.अब्रार पठाण, डॉ.निलोफर पठाण, यांच्यासह परंडा उपजिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, नर्स, ब्रदर्स व कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top