उस्मानाबाद जिल्ह्यात ३ ठिकाणी चोरी , २ ठिकाणी अपघात , २ ठिकाणी मारहाण गुन्हे दाखल

0



उस्मानाबाद जिल्ह्यात ३ ठिकाणी चोरी , २ ठिकाणी अपघात , २ ठिकाणी मारहाण गुन्हे दाखल


चोरी.

उस्मानाबाद (ग्रा.) पोलीस ठाणे : कामठा येथील- जमीर सय्यद हे पत्नी- आयशा व मुलगी- कियारा यांसह दि. 22 ऑक्टोबर रोजी 08.15 वा. सु. स्कॉर्पिओ वाहन क्र. एम.एच. 14 सीसी 6548 ने बेगडा शिवारातील रस्त्याने प्रवास करत होते. यावेळी ते लघुशंकेसाठी थांबले असता पाठीमागून आलेल्या ॲटोरिक्षातील अविनाश चंद्रकांत शिंदे उर्फ आवड्या, रा. बेगडा यासह 3 अनोळखी व्यक्तींनी सय्यद कुटूंबीयांस लाथाबुक्यांनी मारहान करुन स्कॉर्पिओ चालक- गिरी यांच्या हातावर कुऱ्हाडीने मारुन त्यांना जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. तसेच आयशा यांच्या अंगावरील 20 ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र व 40 ग्रॅम वजनाची सुवर्ण साखळी जबरीने हिसकावून त्यांचा स्मार्टफोन व वाहनाच्या काचा फोडून आर्थिक नुकसान केले. अशा मजकुराच्या आयशा सय्यद यांनी दि. 23 ऑक्टोबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 394, 427, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी पोलीस ठाणे : अच्युत सोपान जराड, रा. कावळेवाडी, ता. उस्मानाबाद यांच्या गावातील गुदामाचा पत्रा अज्ञात व्यक्तीने दि. 22- 23 ऑक्टोबर दरम्यानच्या रात्री उचकटून आतील सोयाबीनची 27 पोती चोरुन नेली. अशा मजकुराच्या अच्युत जराड यांनी दि. 23 ऑक्टोबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

नळदुर्ग पोलीस ठाणे : सचिन सुर्यवंशी, रा. जळकोट, ता. तुळजापूर यांच्या जळकोट येथील कापड दुकानाचे शटर अज्ञाताने दि. 22- 23 ऑक्टोबर दरम्यानच्या रात्री उचकटून आतील विजारी, सदरे व टि- शर्ट असा एकुण 50,000 ₹ चा माल चोरुन नेला. तसेच गावकरी- मिलींद डावरे व सिध्दु सावंत यांच्या अनुक्रमे अमित क्लास स्टोअर व मोबाईल दुकानात चोरी झाल्याचे समजले. अशा मजकुराच्या सचिन सुर्यवंशी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

अपघात.

ढोकी पोलीस ठाणे : ढोकी ग्रामस्थ- इब्राहिम बाबुमियाँ शेख, वय 35 वर्षे हे दि. 21 ऑक्टोबर रोजी 22.00 वा. गावातील शासकीय रुग्णालयासमोरील रस्त्याने पायी जात असतांना मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एटी 7239 ने इब्राहिम यांना पाठीमागून धडक दिल्याने ते गंभीर जखमी होउन मयत झाले. अपघातानंतर जखमीस वैद्यकीय उपचारास न नेता, अपघाताची खबर नजीकच्या पोलीस ठाण्यास न देता नमूद मो.सा. चा अज्ञात चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या मयताचा पुतण्या- सोहेब उस्मान शेख यांनी दि. 23 ऑक्टोबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

नळदुर्ग पोलीस ठाणे : चालक- सचिन जीजाबा जायभाय, रा. अहमदनगर यांनी दि. 21 ऑक्टोबर रोजी 20.00 वा. सु. नळदुर्ग येथील तुळजापूर रस्त्यावर ट्रक क्र. एम.एच. 23 एयु 7890 हा निष्काळजीपने चालवून वाहनास औव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरुन येणाऱ्या ट्रक क्र. के.ए. 39- 7528 ला धडक दिली. या अपघातात सचिन जायभाय हे स्वत: गंभीर जखमी होउन समोरील ट्रकचे आर्थिक नुकसान झाले. अशा मजकुराच्या ट्रक क्र. के.ए. 39- 7528 चे चालक- जैनुलाबोद्दीन शेख, रा. कर्नाटक यांनी दि. 23 ऑक्टोबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

मारहान.

अंबी पोलीस ठाणे : वडगा (नळी) येथील महादेव समिंदर व अक्का समिंदर या दोघांनी पुर्वीच्या वादावरून दि. 21 ऑक्टोबर रोजी 17.00 वा. सु. वडगाव येथे गावकरी- लक्ष्मण गायकवाड यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान केल्याने यात लक्ष्मण यांच्या डाव्या हाताची करंगळी मोडली. अशा मजकुराच्या लक्ष्मण यांनी दि. 23 ऑक्टोबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            दुसऱ्या घटनेत इनगोंदा, ता. पंरडा येथील कैलास व माणिक जगताप या दोघा भावांनी त्यांच्यावर केस दाखल केल्याच्या कारणावरुन दि. 23 ऑक्टोबर रोजी 06.00 वा. सु. गावातील शेतात नातेवाईक- वसंत जगताप यांना उसाने व लोखंडी पाईपने मारहान केल्याने यात वसंत यांचा दात पडून ते जखमी झाले. अशा मजकुराच्या वसंत यांच्या पत्नी- संगीता जगताप यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

बेंबळी पोलीस ठाणे : हरिदास राउतराव, रा. कनगरा यांनी त्यांचे शेत शेजारी- सुभाष कोंडीबा दळवे यांच्या शेतात जाणाऱ्या बांधावर चगळ, काटाड्या टाकल्या होत्या. दि. 22 ऑक्टोबर रोजी 14.30 वा. सु. कनगरा शिवारात सुभाष दळवे यांनी त्याचा जाब हरिदास यांना विचारला असता हरिदास यांसह त्यांची मुले- मुकेश व निलेश यांनी सुभाष दळवे यांना शिवीगाळ करुन काठीने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या सुभाष दळवे यांनी दि. 23 ऑक्टोबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top