डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
उस्मानाबाद, दि.15(जिमाका):- भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आज अभिवादन करण्यात आले.
यावेळी कळंबचे तहसीलदार रोहन शिंदे, अव्वल कारकून नरसिंह ढवळे, शाकीर शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
******