वकिली व्यवसाचा फायदा घेवून खंडणीचा धाक दाखवून खोटया केसेस करत असल्याबाबत गोर सेनेचे जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक अधीक्षकांना निवेदन
उस्मानाबाद :- वकिली व्यवसाचा फायदा घेवून खंडणीचा धाक दाखवून खोटया केसेस करत असल्याबाबत गोर सेनेने दि. 27 ऑक्टोबर 2021 रोजी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक अधीक्षकांना निवेदन देऊन अन्याय झालेल्या नागरिकांना न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.
दि. ०९ / १० / २०२१ रोजी मोजे अंबेजवळगा तांडा येथील बंजारा समाजातील काही लोकांवर तळयातील सांडवावरून पाणी जात असलेल्या किरकोळ कारणावरून विनाकारण मानसिक त्रास देवून खंडणी वसूल करण्याच्या हेतुने खोटी केस दाखल केलेली आहे . अँड . सहदेव प्रभु हराळे यांनी मला खंडणीची रक्कम रु . १,००,००० / - ( अक्षरी एक लाख रु ) द्या म्हणजे मी तुमच्यावर गुन्हा दाखल करणार नाही तरी सदर लोकांची परिस्थतीत गरीब असल्यामुळे त्यांनी सदर रक्कम देण्यास नकार दिल्यामुळे त्यांच्या सदर वकिलाने खोटी केस दाखल केलेली आहे . आतापर्यंत गोरगरीब लोकांवर, पोलीस अधिकारी, व्यापारी लोकांवर खंडणी वसुल करण्याच्या उद्देशाने खोटया केसस दाखल केलेले आहेत . या प्रकरणामध्ये कायद्याची भीती दाखवून पोलीस कर्मचाऱ्यावर दबाव आणत आहेत . तसेच अंबेजवळगे तांडा यथील बंजारा समाजातील लोकावर जे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्याची सखोल चौकशी करण्यात यावी व योग्य ती कार्यवाही करण्यात यावी .
सदर परिस्थतीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून खोट्या केसेस दाखल करणाऱ्या वकिलावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अन्यथा गोर सनाच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रभर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे
या निवेदनावर जिल्हा संघटक दिलीप आडे , जि. सचिन बालाजी राठोड , ता.अध्यक्ष कालिदास चव्हाण , ता. सचिव मोहन राठोड , राजुदास राठोड , रवींद्र पवार , प्रकार चव्हाण इ. आदींच्या सह्या आहेता