उस्मानाबाद जिल्ह्यात अवैध मद्य विरोधी विषेश मोहिमेच्या पहिल्या दिवशी २८ छापे

0

उस्मानाबाद जिल्ह्यात अवैध मद्य विरोधी विषेश मोहिमेच्या पहिल्या दिवशी २८ छापे

उस्मानाबाद जिल्हा : जिल्हाभरात सुरु असलेल्या अवैध धंद्यांना आळा बसावा या हेतूने मा. पोलीस अधीक्षक श्रीमती नीवा जैन यांच्या मार्गदर्शनातून काल व आज अशा दोन्ही दिवशी अवैध मद्य विरोधी मोहिम राबवली जात आहे. यात पहिल्या दिवशी -काल दि. 26.10.2021 रोजी खालील प्रमाणे 28 छापे टाकले. या छाप्यांत पिंपांमध्ये आढळलेला हातभट्टी मद्य निर्मीतीचा सुमारे 5,860 लि. द्रव पदार्थ पोलीसांनी घटनास्थळीच ओतून नष्ट केला. तर दारु जप्त करुन साहित्यासह 282 लि. हातभट्टी दारु, 184 बाटल्या देशी- विदेशी दारु व 24 लि. शिंदी जप्त करुन संबंधीतांविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत 28 गुन्हे संबंधीत पोलीस ठाण्यात नोंदवले आहेत.

1) मुरुम पोलीसांनी 6 ठिकाणी छापे टाकले असता केसरजवळगा गावातील मठामागे राणेश गायकवाड हे 8 लि. हातभट्टी दारु बाळगलेले आढळले. आलूर येथे शंकर राठोड हे 20 लि. हातभट्टी दारु, चंद्रकांत गवंडी हे 14 लि. हातभट्टी दारुसह प्रत्येकी 180 मि.ली. क्षमतेच्या देशी दारुच्या 25 बाटल्या, चनाप्पा क्षिरसागर हे 20 लि. हातभट्टी दारु, तर गंगुबाई धुमाळ 22 लि. हातभट्टी दारु बाळगलेल्या आढळल्या. तसेच मुरुम येथील मिर्झा भुखंडावर हुसणय्या तेलंग हे 15 लि. शिंदी बाळगलेले आढळले.

2) उस्मानाबाद (ग्रा.) पोलीसांनी 2 ठिकाणी छापे टाकले असता येडशी गावातील ठाकरे वस्ती रस्त्यालगत बालाजी ओव्हळ हे 10 लि. हातभट्टी दारु बाळगलेले आढळले. बावी गावातील एका पानटपरी शेजारी बाळासाहेब वाघमारे हे प्रत्येकी 180 मि.ली. क्षमतेच्या देशी दारुच्या 18 बाटल्या बाळगलेले आढळले.

3) वाशी पोलीसांनी 3 ठिकाणी छापे टाकले असता लाखनगाव येथे छाया शिंदे या 9 लि. हातभट्टी दारु बाळगलेल्या, सरमकुंडी येथे कमलाबाई काळे या 9 लि. हातभट्टी दारुसह प्रत्येकी 180 मि.ली. क्षमतेच्या देशी दारुच्या 5 बाटल्या,  सोनैवाडी येथे उत्रेश्वर शिंदे 10 लि. हातभट्टी दारु बाळगलेले आढळले.

4) कळंब पोलीसांनी 3 ठिकाणी छापे टाकले असता इटकुर येथे जयश्री शिंदे या 15 लि. हातभट्टी दारु, कळंब येथील पर्यायी मार्गाजवळ संगीता पवार या हातभट्टी दारु निर्मीती करीता गुळ-पाणी मिश्रणाचा 300 लि. आंबवलेल्या द्रवपदार्थासह 10 लि. हातभट्टी दारु बाळगलेल्या आढळल्या. मोहा येथील खामसवाडी रस्त्यालगत अजित मडके हे प्रत्येकी 180 मि.ली. क्षमतेच्या देशी दारुच्या 10 बाटल्या बाळगलेले आढळले.

5) आनंदनगर पोलीसांना पारधी पिढी, सांजा येथे शिवाजी पवार हे 35 लि. हातभट्टी दारु बाळगलेले आढळले.

6) भूम पोलीसांना इंदीरानगर येथे हिराबाई पवार या हातभट्टी दारु निर्मीती करीता गुळ-पाणी मिश्रणाचा 160 लि. आंबवलेला द्रवपदार्थ पिंपात बाळगलेल्या आढळल्या.

7) बेंबळी पोलीसांनी 2 ठिकाणी छापे टाकले असता माकणी येथे संग्राम पवार तर कनगरा येथे शेषेराव राठोड हे प्रत्येकी 180 मि.ली. क्षमतेच्या देशी दारुच्या 35 व 30 बाटल्या बाळगलेले आढळले.

8) उस्मानाबाद (श.) पोलीसांना जुने बस आगारामागील नाल्यात दत्ता चव्हाण हे हातभट्टी दारु निर्मीती करीता गुळ-पाणी मिश्रणाचा 1,400 लि. आंबवलेला द्रवपदार्थ प्लास्टीकच्या पिंपात बाळगलेले आढळले.

9) उमरगा पोलीसांनी 4 ठिकाणी छापे टाकले असता मसनजोगी वस्ती परिसरात अलिम नदाफ हे 9 लि. शिंदी हे मादक द्रव्य, तुरोरी येथे लक्ष्मण लिंबोळे हे 30 लि. हातभट्टी दारु, कदेर येथे अमोल कुनाळे हे 40 लि. हातभट्टी दारु, तर मुळज येथे संतोष जेवळे हे प्रत्येकी 180 मि.ली. क्षमतेच्या देशी दारुच्या 10 बाटल्या बाळगलेले आढळले.

10) अंबी पोलीसांना वाटेफळ बस थांब्याजवळ लक्ष्मण गिरवले हे पोलीस छाप्याची चाहूल लागताच प्रत्येकी 180 मि.ली. क्षमतेच्या देशी दारुच्या 36 बाटल्या घटनास्थळावर सोडून पळाले.

11) तुळजापूर पोलीसांनी 2 ठिकाणी छापे टाकले असता अपसिंगा येथे कर्ण डोलारे हे 15 लि. हातभट्टी दारु, काक्रंबा येथे बाळु मस्के हे 15 लि. हातभट्टी दारु बाळगलेले आढळले.

12) ढोकी पोलीसांनी जागजी येथील हातभट्टी दारु निर्मीतीच्या अड्ड्यावर छापा टाकला असता बालाजी आडे, सविता आडे, अंकुश चव्हाण, माणिक व विनायक राठोड हे हातभट्टी दारु निर्मीती करीता गुळ-पाणी मिश्रणाचा 4,000 लि. आंबवलेला द्रवपदार्थ प्लास्टीकच्या पिंपांत बाळगलेले आढळले.

13) लोहारा पोलीसांना कास्ती बुद्रुक येथे गौतम भंडारे हे प्रत्येकी 180 मि.ली. क्षमतेच्या देशी दारुच्या 15 बाटल्या बाळगलेले आढळले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top