google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 बनावट इंधन विक्री प्रकरणी अखेर कारवाई , गुन्हे दाखल

बनावट इंधन विक्री प्रकरणी अखेर कारवाई , गुन्हे दाखल

0



बनावट इंधन विक्री प्रकरणी अखेर कारवाई , गुन्हे दाखल 

उमरगा पोलीस ठाणे : उमरगा परिसरात जैव डिझेल सदृश्य इंधनाची धोकादायकरित्या विक्री होत असल्याच्या माहितीवरुन उमरगा पोलीसांनी दि.24.10.2021 रोजी 23.30 वा. येळी शिवारातील लकी ढाबा परिसरात छापा टाकला. यावेळी ढाब्यामागील पत्रा शेडमध्ये 2,000 लि. क्षमतेच्या 13 प्लास्टीक टाक्यांमध्ये प्रत्येकी 230 लि. बायोडिझेल सदृश्य द्रव इंधन असे एकुण 2990 लि. इंधन, 2,500 लि. क्षमतेच्या 3 रिकाम्या प्लास्टीक टाक्या, द्रव पदार्थ मोजण्यासाठी तोटीसहीत नळी व मीटर असलेले मापन यंत्र, प्रत्येकी 1 व 1.5 अश्वशक्ती क्षमतेच्या दोन विद्युत उपसा पंपांसह नळ्या, विद्युत निर्मीतीचा एक लघु संच, ट्रक क्र. के.ए. 56- 5665 अशा साहित्यानिशी अवैध इंधन विक्री व्यवसायास धोकादायकपने बाळगले असल्याचे आढळले. या प्रकरणी पोना- संजीव शिंदे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन बसवकल्याण, कर्नाटक येथील रवि चंदनखेरे, तिपन्ना पिलमगोले, सतिश सरवदे, स्वामी, यांसह येळी ग्रामस्थ -अब्दुल शेख, यांच्याविरुध्द भा.दं.सं. कलम- 285, 287, 336, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top