google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 आष्टा कासार येथे शेती शाळा मध्ये शेतकरी मासिक वाचन

आष्टा कासार येथे शेती शाळा मध्ये शेतकरी मासिक वाचन

0
आष्टा कासार येथे शेती शाळा मध्ये शेतकरी मासिक वाचन 


लोहारा/प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील आष्टा कासार येथे कृषी विभागाच्या वतीने दि.11 नोव्हेंबर रोजी शेती शाळा घेण्यात आली. यावेळी शेतकरी मासिक वाचन करण्यात आले. यावेळी कृषी सहाय्यक सचिन पवार यांनी शेतकऱ्यांना महाडीबीटी अंतर्गत विविध योजना, MREGS अंतर्गत फळबाग, गांडूळ ,नॅडेप, इ.योजनांमधे शेतकऱ्यांना प्रस्ताव सादर करावे असे, सांगितले आवाहन केले. यावेळी शेतकऱ्यांना सरपंच सौ.सुलभा कांबळे यांच्या हस्ते शेतकरी मासिक वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास ग्रामसेवक मारुती बनशेट्टी,  प्रगतशील शेतकरी रवींद्र शिदोरे, जिनेंद्र पाटील, सिद्राम तडकले, खंडू शेरीकर, तुळशीदास कोरे, मुकेश मुळे, अमोल बलसुरे, यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top