उस्मानाबाद जिल्ह्यात दोन ठिकाणी अपघात : तीन ठिकाणी मारहाण
अपघात.”
उमरगा पोलीस ठाणे : कसगी, ता. उमरगा येथील सतिश शिवानंद बोरुटे, वय 22 वर्षे हे दि. 04.11.2021 रोजी 18.00 वा. सु. कसगी शिवारातील आळंद- चौरस्ता रस्त्याने पायी जात होते. यावेळी ग्रामस्थ- मल्लिकार्जुन शिवाजी कलशेट्टी यांनी वॅगन आर कार क्र. एम.एच. 14 ईयु 8148 ही निष्काळजीपने चालवून सतिश बोरुटे यांना पाठीमागून धडक दिल्याने बोरुटे यांच्या डोक्यास गंभीर मार लागून ते मयत झाले. अशा मजकुराच्या मयताचे पिता- शिवानंद बोरुटे यांनी दि. 09.11.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ), 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
दुसऱ्या घटनेत जगदाळवाडी, ता. उमरगा येथील निखिल भानुदास चव्हाण, वय 14 वर्षे हा दि. 03.11.2021 रोजी 10.30 वा. सु. गावातील रस्त्याने पायी जात होते. यावेळी ग्रामस्थ- आकाश दिलीप हाके यांनी मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एटी 7187 ही निष्काळजीपने चालवून निखिल यास पाठीमागून धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. अशा मजकुराच्या निखिलचे पिता- भानुदास चव्हाण यांनी दि. 09.11.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
“मारहान.”
बेंबळी पोलीस ठाणे : अनसुर्डा, ता. उस्मानाबाद येथील वाघमारे कुटूंबातील आण्णा, अनिल, सुनिल, अनिता, माधुरी, छाया या सर्वांनी गावठानच्या भुखंडावरील दगड काढण्याच्या कारणावरुन दि. 08.11.2021 रोजी 21.00 वा. सु. गावातील मरीआई चौकात ग्रामस्थ- निशिकांत दत्तु हुंबे यांसह त्यांची पत्नी व भाऊ यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या निशिकांत हुंबे यांनी दि. 09.11.2021 रोजी 324, 323, 504, 506, 143, 147, 149 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
तामलवाडी पोलीस ठाणे : सुरतगाव, ता. तुळजापूर येथील लखन भोसले, प्रशांत कांबळे, उत्रेश्वर भोसले, आकाश भोसले, अक्षय भोसले या सर्वांनी पुर्वीच्या भांडणावरुन दि. 07.11.2021 रोजी 15.30 वा. सु. गावातील बुध्दविहारसमोर ग्रामस्थ- नवनाथ सुरते यांसह त्यांची मुलगी- मनिषा व भाचा- मनोज यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या नवनाथ सुरते यांनी दि. 09.11.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी पोलीस ठाणे : किणी, ता. उस्मानाबाद येथील दंडनाईक कुटूंबातील अभिमन्यु, हणमंत, अक्षय, विलास, हरी, विशाल या सर्वांनी शेत रस्त्याने रहदारी केल्याच्या कारणावरुन दि. 25.10.2021 रोजी 18.30 वा. सु. किणी येथे ग्रामस्थ- नरसिंग विलास हाजगुडे यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याच्या उद्देशाने लोखंडी गज, दगड, काठीने, लाथाबुक्क्यांनी मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या नरसिंग हाजगुडे यांनी दि. 09.11.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 307, 143, 147, 148, 323, 504 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.