लोहारा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपंचायतवर शिवसेनेची सत्ता स्थापन होणे अत्यंत गरजेचे आहे -- आ.ज्ञानराज चौगुले
लोहारा/प्रतिनिधी
लोहारा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपंचायतवर शिवसेनेची सत्ता स्थापन होणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन आ.ज्ञानराज चौगुले यांनी केले. लोहारा नगरपंचायतच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दि.22 नोव्हेंबर रोजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी लोहारा शहरातील शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. आ.ज्ञानराज चौगुले मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की, लोहारा शहरांतर्गत सोयी - सुविधा पुरविण्यासाठी मागील पाच वर्षाच्या काळात जिल्हा वार्षिक योजनेच्या व महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाच्या माध्यमातून भरघोस निधी मंजूर करून घेऊन विकास कामे पूर्ण केली.
सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री शिवसेनेचे, नगर विकास मंत्री शिवसेनेचे, पालकमंत्री शिवसेनेचे, स्थानिक खासदार शिवसेनेचे, आमदार शिवसेनेचे असल्याने शहराच्या उर्वरित भागाचा विकास करण्यासाठी आणखीन भरघोस असा निधी मंजूर करून घेऊ शकतो. याकरिता आगामी नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेची सत्ता स्थापन होणे गरजेचे आहे. याकरिता शिवसैनिकांनी
"एक दिलाने एकसंघ" राहून आपले कार्य जनतेपर्यंत पोहोचल्यास लोहारा नगरपंचायत वर शिवसेनेचा भगवा निश्चितपणे फडकेल तसेच या पुढील काळात गद्दारांना शिवसैनिक त्यांना त्यांची जागा टाकून देतील अशी ग्वाही आमदार ज्ञानराज चौगुले यांनी दिली.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पनुरे, माजी तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर सूर्यवंशी, उपतालुकाप्रमुख जगन पाटील, युवासेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, माजी नगरसेवक अभिमान खराडे, जिल्हा सहकार बोर्ड संचालक अविनाश माळी, शहर प्रमुख सलीम शेख, महेबूब गवंडी, विजय फावडे, माजी नगरसेवक श्याम नारायणकर, प्रमोद बंगले, अतिक पठाण, माजी उपनगराध्यक्ष प्रताप घोडके, भरत सुतार, युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, पं.स.माजी सदस्य दिपक रोडगे, मुन्नाभाई फकीर, हमीद पठाण, उमर पठाण, जनक कोकणे, माजी नगरसेवक बाळासाहेब कोरे, ओम कोरे, आमीन भाई सुंबेकर, बळी रोडगे, कुर्बान खूटेपाड, सतीश माळी, नितीन वाघ, संदीप माळी, प्रशांत काळे, मधुकर भरारे, शिवाजी सुतार, तानाजी घोडके, गौस मोमिन, श्रीशैल स्वामी, शिवहार नारायणकर, मोहम्मद हिप्परगे, गणेश विरुदे, अमोल माळी, कदम, गोटू माळवदकर, आदि, उपस्थित होते.