google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तामलवाडी येथे संविधान दिन उत्साहात साजरा

सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तामलवाडी येथे संविधान दिन उत्साहात साजरा

0
सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तामलवाडी येथे संविधान दिन उत्साहात साजरा

    तामलवाडी - दि  26 नोव्हेंबर येथील सरस्वती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय तामलवाडी तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद या शाळेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  प्रतिमेचे पूजन करून संविधान दिन व 26/ 11 च्या मुंबई हल्ल्यातील शहिदांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सुभाष जाधव तर प्रमुख पाहुणे  पर्यवेक्षक गणेश हलकरे ज्येष्ठ शिक्षक औदुंबर माडजे यांच्या हस्ते  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .तर सामाजिक अंतर ठेवून  शिक्षक महादेव मसुते  यांनी संविधान दिन व शहिदांच्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमाविषयी   सविस्तर माहिती दिली 

 यावेळी ज्येष्ठ शिक्षक औदुंबर माडजे ,चंद्रकांत साळुंखे , चांगदेव  सावळे, प्रभाकर जाधव ,शिवकुमार सिताफळे, सुहास वडणे  ,महादेव मसुते,  महादेव माळी , लक्ष्मण पाटील, विनोद कुंभार , प्रशांत चुंगे , बालाजी साठे , गिरीश जाधव ,योगेश राऊत, श्री गणेश स्वामी ,बालाजी रणसुरे, दत्तू कोकरे ,सुनील पाटील,  महिला शिक्षिका श्रीमती शाहिदा पिरजादे , मनिषा गिरे, मनीषा सावंत ,विठाबाई पाटील तसेच  शिक्षक एम. एम. मसुते यांनी सूत्रसंचालन केले या कार्यक्रमास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top