त्रिपुरा प्रदेशात अल्पसंख्याक मुस्लिम समाजावर क्रूरतेने हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी -- मुस्लिम समाजाची मागणी
लोहारा/प्रतिनिधी
त्रिपुरा प्रदेशात अल्पसंख्याक मुस्लिम समाजावर क्रूरतेने हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, या घटनेचा निषेध व्यक्त व्यक्त करुन लोहारा शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने राष्ट्रपती यांना लोहारा तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, त्रिपुरा प्रदेशात अल्पसंख्याक मुस्लिम समाजावर क्रूरतेने झालेल्या हल्ल्याचा निषेध करून व तेथील अल्पसंख्याक मुस्लिम समाजाला संरक्षण देण्यात यावे. त्रिपुरा राज्यात मागील आठवड्यात विश्व हिंदू परिषद यांच्या लोकांनी बांगलादेश देशातील दुर्गा पुजा हिंसाचाराचा निमित्त करून एक नियोजित रॅली काढून शांततेचे राज्य असलेल्या प्रदेशांमध्ये खास करून मुस्लिम समुदायाला लक्ष करून मोठ्या प्रमाणात दंगल करून मज्जित व मालमत्तेचे जाळपोळ करून नुकसान पोहोचविले आहे. आम्ही या घटनेचा निषेध करीत आहोत त्रिपुरा राज्यात पाच जिल्हा मशिदी व मुस्लिम समाजाचे घरे मालमत्तेचे नुकसान विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. तरी या कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी व येथील अल्पसंख्याक मुस्लीम समुदायाला संरक्षण देण्यात यावी अशी मागणी निवेदनात केली आहे. यावेळी
शब्बीर गवंडी, हाफीज शमशोद्दीन पठाण, आयुब हबीब शेख, पेशइमाम गणी अत्तािर, इकबाल कुरेशी, हाजी बाबा शेख,, सलीम शेख, आब्बास शेख, महेबूब गवंडी, परवेज तांबोळी, आमीन मुलानी, आशपाक शेख, निहाल मुजावर, सलीम सय्यद, आरिफ खानापुरे, समीउल्ला पठाण,बशीर खडीवाले, शोएब मनियार, शारुख गवंडी, मोईज शेख, फयाज नदाफ, समीर हेड्डे, सरफराज सिध्दमकी, कलिम कुरेशी, हाजु खुटेपड, मुजाहिद मुल्ला, आदी उपस्थित होते.