google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 अवैध गुटखा वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश

अवैध गुटखा वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश

0

गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू आणि सुपारी, खर्रा, मावा यासारख्या प्रतिबंधित अन्नपदार्थांचे उत्पादन आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्रात गुटखाबंदी लागू करण्यात आली असून त्याची कठोर अंमलबजावणी सुरू आहे. परंतु इतर राज्यातून येणारा गुटखा रोखण्यासाठी सीमेवरील तपासणी कडक करण्यात यावी. तसेच अवैध गुटखा वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.

प्रतिबंधित पदार्थाच्या बंदीची अंमलबजावणी अन्न व औषध प्रशासनामार्फत पोलिस विभागाच्या सहाय्याने करण्यात येते. परंतु परराज्यातून मोठ्या प्रमाणावर गुटखा अवैध पद्धतीने राज्यात आणला जातो व त्याचे वितरण आणि विक्री केली जाते. यासाठी अन्न व औषध प्रशासन तसेच पोलिस विभागाने संयुक्तपणे मोहिम राबवावी. पोलिस यंत्रणांनी या सर्व अन्नपदार्थांची उत्पादन, विक्री, साठवणूक, वितरण व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध अधिक दक्ष राहून प्रभावीपणे कारवाई करावी. तसेच प्राप्त तक्रारीची तातडीने दखल घेऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top