google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 उस्मानाबादमध्ये सातवाहन कालीन जाते सापडले

उस्मानाबादमध्ये सातवाहन कालीन जाते सापडले

0



उस्मानाबादमध्ये सातवाहन कालीन जाते सापडले

 उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सातवाहन कालीन जाते इतिहास संशोधक जयराज खोचरे यांना सापडले आहे.  हे सातवाहन कालीन जाते दोन हजार वर्षांपूर्वीचे असून, आजही सुस्थिती मध्ये आहे.

उस्मानाबाद जिल्ह्याला वैभवशाली असा इतिहास लाभला आहे, सातवाहन काळात हा भाग आर्थिक उन्नतीच्या शिखरावर होता. तेर सारखी मोठ मोठी केंद्रे या भागात उदयाला आली. 


 तेरला मोठा व्यापार होत असल्याने, दक्षिण भारतातून व पश्चिम महाराष्ट्र, कोकणातून कच्चा माल तेर सारख्या व्यापारी ठिकाणी येऊ लागला. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील डोंगर-दरीतून व्यापारी मार्ग निर्माण होऊ लागले, याच व्यापारी मार्गावर वसाहती स्थापन होऊ लागल्या.


यात सिद्धेश्वर वडगाव, चिवरी, तीर्थ बु. तुळजापूर, अपसिंगा, वरवंटी, उस्मानाबाद इ. ठिकाणी सातवाहन काळातील खापरे, मनी, विटा इ वस्तू सापडतात


उस्मानाबाद शहराच्या वैरागरोड भागात सातवाहन कालीन मोठी वसाहत आहे, त्याच आवरत काल संशोधन करत असताना इतिहास व पुरातत्व शास्त्राचे अभ्यासक जयराज खोचरे यांना हे जाते सापडले.

हे सातवाहन जाते 2000 हजार वर्षांपूर्वीचे असून, आज ही सुस्थिती मध्ये आहे असे जयराज खोचरे यांनी सांगितले

 हे जाते सापडल्याने या वसाहतीमध्ये मानवी वावर असल्याचा हा महत्वपूर्ण असा पुरावा आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top