google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 शहरातील माळी गल्ली येथे लसीकरण मोहीम

शहरातील माळी गल्ली येथे लसीकरण मोहीम

0








शहरातील माळी गल्ली येथे लसीकरण मोहीम

उस्मानाबाद शहरातील माळी गल्ली नागनाथ रोड येथे नूरानी ग्रूपच्या वतीने लसीकरण मोहीम राबविण्यात आली
यामध्ये 61 नागरिकांना कोविशील्ड लस देण्यात आली या ठिकाणी नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

वैराग रोड प्राथमिक आरोग्य केंद्र यूपीएससी क्र. 1 व नुराणी ग्रुपच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून उस्मानाबाद काँग्रेसचे जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने यांचे मार्गदर्शन लाभले.

यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे 1 चे डॉ शकिल खान, नुरानी ग्रूप चे अध्यक्ष सादिक भाई कुरेशी, उपअध्यक्ष इरशाद कुरेशी, इसतयाक कुरेशी, अरबाज जिकरे, शहेबाज शेख, हामिद पठाण, शाहब कुरेशी, अबरार कुरेशी, राफेर मणियार, फैयाज बागवान उपस्थित होते. नूरानी ग्रूप तर्फे आभार प्रदर्शन इसतयाक कुरेशी यानी केले व सामाजिक कार्यात नूरानी गुरुप सतत आग्रेसर आहे व राहिल अशी गवाही दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top