जिल्हाधिकारी कार्यालयात इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन आणि राष्ट्रीय एकात्मता दिनाची शपथ
उस्मानाबाद,दि.19(जिमाका):-.भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच राष्ट्रीय एकात्मता दिनाची शपथ घेण्यात आली.
यावेळी सामान्य प्रशासनचे नायब तहसीलदार पंकज मंदाडे, जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहाय्यक कुलकर्णी, अव्वल कारकून दीपक चिंतेवार, नरसिंह ढवळे, महेश कुलकर्णी आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.