चोरीतील ४९ ग्रॅम सुवर्ण दागिने, १६ स्मार्टफोन व मोटारसायकलसह दोघे अटकेत.”
उस्मानाबाद :- स्थानिक गुन्हे शाखा: स्था.गु.शा. च्या पोनि- श्री. गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखालील सपोनि- श्री. शैलेश पवार, पोउपनि- श्री. पांडुरंग माने, पोहेकॉ- मेहबूब अरब, पोना- हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, शैला टेळे, पोकॉ- रवींद्र आरसेवाड, अविनाश मरलापल्ले, अशोक ढगारे, बबन जाधवर, साईनाथ असमोड, आनंद गोरे यांचे पथक काल दि. 28 नोव्हेंबर रोजी गस्तीस होते.
दरम्यान पथकास गोपनीय माहिती मिळाली की, उस्मानाबाद येथील 1)अजय श्रावण शिंदे, वय 21 वर्षे 2)सुनिल श्रावण शिंदे उर्फ काळ्या, वय 23 वर्षे हे दोघे काही दिवसांपासून चोरीचे सुवर्ण दागिने, भ्रमणध्वनी व मोटारसायकल संशयीतरित्या बाळगून आहेत. यावर पथकाने त्या दोघांस ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या राहत्या ठिकाणी छापा मारला असता पोलीसांची चाहूल लागताच ते दोघे पळू लागले. यावर पथकाने त्या दोघांचा दिड कि.मी. पाठलाग करुन त्यांस पकडले असता त्यांच्या ताब्यात आढळलेल्या 49 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने, एक मोटारसायकल व 16 भ्रमणध्वनी बाबत मालकी- ताबा या विषयी त्यांस विचारले. या मालाबाबत त्यांनी समाधानकारक माहिती न दिल्याने पथकाने अभिलेख पडताळणी तसेच मोटारसायकलचा सांगाडा, इंजीन क्रमांक, फोनचे आयएमईआय क्रमांक पडताळले असता नमूद माल ढोकी पो.ठा.-1, उस्मानाबाद (ग्रा.)- 2, येरमाळा- 1 या दरोडा, घरफोडी, चोरी अशा 4 गुन्ह्यांसह सोलापूर जिल्ह्यातील माढा पो.ठा.- 1 अशा चोरीच्या गुन्ह्यांतील आरोपी असल्याचे समजले. अधिक माहिती घेता अजय व सुनिल शिंदे हे दोघे चोरीच्या अनुक्रमे 13 व 6 गुन्ह्यांत पोलीसांना हवे असल्याचे समजले.
यावर पथकाने नमूद चोरीच्या मालासह गुन्हा करण्यास वापरलेली मोटारसायकल, लोखंडी कटावनी व हुक तसेच लोखंडी गज, कुलूप तोडण्याची पक्कड जप्त करुन नमूद दोघांना अटक केली आहे.