google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 अमोल कोल्हे यांची मोठी घोषणा निर्णय घेण्याची शक्यता! , राष्ट्रवादीला धक्का! - Facebook post by Dr. Amol Kolhe

अमोल कोल्हे यांची मोठी घोषणा निर्णय घेण्याची शक्यता! , राष्ट्रवादीला धक्का! - Facebook post by Dr. Amol Kolhe

0


डॉक्टर अमोल कोल्हे यांची पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे अमोल कोल्हे राष्ट्रवादी नाराज आहेत का ते राष्ट्रवादी सोडणार आहेत का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत .

राष्ट्रवादीचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे काही काळासाठी एकांतवासात जात आहेत अशी पोस्ट देखील त्यांनी फेसबुक अकाउंट वरून माहिती दिली आहे त्यामुळे डॉक्टर अमोल कोल्हे राष्ट्रवादी सोडणार का अशा चर्चेला महाराष्ट्रभर चर्चेला उधान आले आहे.

डॉक्टर अमोल कोल्हे नेमका कोणता फेरविचार करणार कदाचित राष्ट्रवादी सोडणार नाहीत अशा अनेक प्रश्न सोशल मीडियावर सध्या उपस्थित होताना दिसत आहेत त्यांच्या पोस्टमध्ये काय लिहिले आहेत पाहूया


सिंहावलोकनाची वेळ:- गेल्या काही दिवसांत, महिन्यांत, वर्षांत बेभान होऊन धावत राहिलो, काही टोकाचे निर्णय घेतले, अनपेक्षित पावलं उचलली.  पण हे सगळं जुळवताना झालेली ओढाताण, तारेवरची कसरत, वेळेची गणितं, ताणतणाव यामुळे जरा थकवा आलाय..थोडा शारीरिक, बराचसा मानसिक! शारीरिक थकवा आरामाने निघून जाईल पण मानसिक थकवा घालवण्यासाठी हवं- थोडं मनन, थोडं चिंतन! 
घेतलेल्या निर्णयांचा विचार, आणि कदाचित फेरविचार सुद्धा!
त्यासाठीच एकांतवासात जातोय.. काही काळ संपर्क होणार नाही! पुन्हा लवकरच भेटू...नव्या जोमाने, नव्या जोशाने!!  टीप:- फक्त चिंतनासाठी जातोय, चिंतनशिबिरासाठी नाही😜

अशी पोस्ट डॉ अमोल कोल्हे यांनी फेसबुक द्वारे चार दिवसा पूर्वी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top