असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडी वर कारवाई करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला पाच हजार रुपये बक्षीस - Prize of 5000 thousand
सोलापूर :- एमआयएमचे ( AIMIM ) खासदार असद्दुदीन ओवेसी ( Asaduddin Owaisi ) मंगळवारी सोलापूर दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी रॅलीला संबोधित करताना शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीसह काँग्रेसवरही जोरदार टीका केली मंगळवारी दुपारी असद्दुदीन ओवेसी ( Asaduddin Owaisi ) यांचं सोलापुरात आगमन झाले
असद्दुदीन ओवेसी ज्या गाडीमध्ये आले त्या लॅन्डरोव्हर गाडीला समोरील बाजूला नंबरप्लेट नव्हती मागील बाजूला नंबरप्लेट लावलेली होती त्यामुळे सोलापूर वाहतूक पोलीस अधिकाऱ्यानं त्यांना 200 रुपयांचा दंड ठोठावला होता या पोलीस अधिकाऱ्याला चांगल्या कामगिरीबद्दल सोलापूर आयुक्तांनी पाच हजार रुपयांचं बक्षीस दिलं आहे.
सोलापूर ( solapur )दौऱ्यावर असणारे असद्दुदीन ओवेसी ( Asaduddin Owaisi ) शासकीय विश्रामधाम येथे लॅन्डरोव्हर या गाडीने आले होते. या गाडीला पुढील बाजूला नंबरप्लेट नव्हती. मात्र गाडी ओवीसी यांच्या नावावर नाही गाडी दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर आहे गाडी गाडी मालक व्यक्तीवरोधात पोलिसांनी कारवाई केली. आणि 200 रुपयांचा दंड वसूल केला. वाहतूक पोलिसांनी त्यांना वाहनाला नंबरप्लेट लावण्याच्या सूचना केल्या. त्यावेळी चालकाने तत्काळ समोरील बाजूस नंबरप्लेट लावून घेतली. ज्या पोलिसांनी ही कारवाई केली त्यांना पोलीस आयुक्तांनी 5 हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे.
असद्दुदीन ओवेसी ( Asaduddin Owaisi ) आलेल्या लॅन्डरोव्हर, वाहन क्रमांक टीएस-११ / ईव्ही-९९२२ या वाहनांवर पुढील बाजूस नंबरप्लेट नसल्याने सदर चारचाकी वाहनावर केंद्रीय मोटार वाहन कायदयानुसार सीएमव्हीआर कलम 50/177 अन्वये कारवाई करण्यात आली. या वाहनचालकाकडून पोलीस अधिकाऱ्यानं दोनशे रुपयांचा दंड वसूल केला. ही कामगिरी सोलापूर पोलीस निरिक्षक वाबळे यांचे समवेत सपोनि चिंतांकिदी आणि हवालदार सिरसाट यांनी निपक्षपातीपणे केली. त्यांच्या चांगल्या कामगिरी बद्दल सोलापूर शहर पोलीस आयुक्त यांनी चिंताकिंदी यांना रोख पाच हजार रुपयांचे बक्षीस मंजूर करुन गौरव केला .