रामदास मारुती मगर यांच्या वतीने क्रिकेट संघास किटचे वाटप

0

रामदास मारुती मगर यांच्या वतीने क्रिकेट संघास किटचे वाटप


प्रतिनिधी : (सांगवी काटी)
बहुचर्चित एल. सी. सी प्रीमिअर लीग मध्ये जय जवान जय किसान, राजे संभाजी एलेव्हण या दोन्ही संघांना अष्टविनायक इलेक्ट्रिकल अँड मशनरी व रत्ना पंपाचे अधिकृत डीलर रामदास मगर यांच्या तर्फे जर्शी किटचे वाटप करण्यात आले.या वेळी माळुंब्रा, गोंधळवाडी, सुरत गाव, पांगरधरवाडी, सांगवी काटि गावातील सर्व क्रिकेट प्रेमी उपस्थित होते.

या प्रीमियर लीगच्या सामन्याचे उद्घाटन             महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील क्रिकेट प्रेमी प्रगतशील द्राक्ष बागायतदार श्री प्रकाश मगर यांच्या हस्ते आई तुळजाभवानी चा प्रतिमेचे पूजन करून श्री फळ फोडून करण्यात आले. यावेळी विशाल मगर, दिनेश माळी, मंगेश गाटे, महेश मगर, विजय मगर, सांगवी (का) परिसरातील सर्व क्रिकेट प्रेमी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top