शहराचा विकास झाला की ? नगराध्यक्ष व त्यांच्या निकटवर्तीयांचा विकास झाला-अभय इंगळे
उस्मानाबाद : उस्मानाबाद शहराचा विकास झाला की ? नगराध्यक्ष व त्यांच्या निकटवर्तीयांचा विकास झाला हे जनतेने उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे,नगराध्यक्ष व त्यांच्या निकटवर्तीयांचा पाच वर्षात झालेला प्रचंड विकास याची खमंग चर्चा शहरवासीयामध्ये
गेल्या पाच वर्षापासून सुरू आहे.
काल झालेल्या पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष यांनी त्यांच्यामार्फत न झालेल्या कामांचे सुद्धा श्रेय घेऊन माहीती दिली, ज्या उजनी पाणी प्रश्नाबाबत ते बोलत आहेत. त्या योजनेमुळे आज धाराशिव शहरातील नागरिकांना पाण्याची कमतरता भासली नाही यासाठी कोणत्या नेत्यांचे प्रयत्न फळास आले हे त्यानांही चांगलेच माहित आहे,की गेल्या पाच वर्षांपूर्वी सत्तेत असणाऱ्या आ. राणादादा यांच्या नेतृत्वातील नगर परिषद यांच्या कार्यामुळेच ही योजना पूर्णत्वास जाणे शक्य झाले आहे.
त्याच बरोबर ज्या भारतीय जनता पार्टी वर ते जोरदार टीका करत आहेत त्याच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळात धाराशिव नगर परिषदेसाठी सर्वाधिक निधी मंजुर झाला, आणि ज्या योजना नगराध्यक्षांनी नगर परिषदेत राबविल्या त्यामध्ये स्वच्छ भारत अभियान, पंतप्रधान आवास योजना, अटल जलजिवन मिशन आणि यासारख्या अनेक योजना या केंद्रात सत्तेत असणाऱ्या भारतीय जनता पार्टीने राबविल्या आहेत आणि त्यांच्या आशिर्वादानेच धाराशिव नगर परिषदेस केंद्राकडुन भरघोस निधी उपलब्ध झाला आहे, आशी टिका भाजपचे युवा मोर्चा जिल्हा समन्वयक तथा माजी उपनगराध्यक्ष अभय इंगळे यांनी केली.
गेल्या पाच वर्षात आपण सांगत आहात की 95% विषय मंजुर केले आहेत. परंतु त्यापैकी किती कामे चालु आहेत अथवा त्यामुळे शहराचा विकास झाला हे त्यांनी सांगावे शहरातील जनता इतकी अज्ञाणी नाही. शिवसेनेच्या नेतृत्वाखालील नगर परिषदेतील बोलणाऱ्यांनी खालील प्रश्नासंदर्भात काय केले ते सांगावे.
1) शहराच्या हद्दवाढ भागात कोणती विकास कामे झाली?
2) उस्मानाबाद शहराच्या सौंदर्यात भर टाकणारी उदयाने कोठे आहेत?
3) उस्मानाबाद शहराला रोज पाणी येणे अपेक्षीत होते. परंतु शहरवासीयांना सद्यस्थितीत कधी पाणी येते?
4) शहरात सर्व ठिकाणी उजनीची पाईपलाईन टाकण्यात आली आहे काय?
तसेच साळुंके नगर, वाडगा (शेरकर), जाधववाडी रागुची वाडी केकस्थळवाडी यांच्या पाणी प्रश्नाचे काय ? शहराप्रमाणेच या भागात सोईसुविधा दिल्या कार
6) शहरातील नागरिकांच्या मालमलेच्या करात मोठी वाढ का करण्यात आली?
7) शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले व 2016 पूर्वी तयार झालेले नाट्यगृह या पाच वर्षाच्या काळात सर्व सुख-सुविधेसह शहरवासियांच्या सेवेत उपलब्ध झाले का?
8) शहरातील वक्फ बोर्डाच्या अख्यतारीत खालील जागेवर विकास कामे झाली का?
9) कोरोनाच्या पार्श्वभुमिवर शहरात कोविड हॉस्पिटलचे काय झाले?
10) नगर परिषदेतील कर्मचारी वर्गाला 7 व्या वेतन आयोगाचा फरक कधी देण्यात आला?
11) 44 कर्मचाऱ्यांना कायम केले, पण खरी वस्तु स्थिती काय आहे?
न्यायालयीन लढाई नंतर मा.ना.देवेंद्रजी फडणवीस यांनी कायम करण्याचे आदेश दिले त्यामुळे तत्कालीन युतीचे पदाधिकारी नितीन काळे यांना सोबत घेऊन पत्र दिले.
12)शहरातील मोकळया जागे मध्ये किती वृक्षारोपन केले? व सद्यस्थित किती झाडे जिवंत आहेत याचा लेखा जोखा?
13) केंद्र सरकारच्या पुढाकाराने सुरु झालेल्या एल.ई.डी. दिवे बसविण्याच्या योजनेमध्ये आपले काय योगदान आहे?
हि योजना भाजपाच्या मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पणेतुन व नगर विकास मंत्री व्यंकया नायडु यांच्या माध्यमातुन तात्कालीन उर्जा मंत्री पियुशजी गोयल यांनी पुढाकार घेऊन ही योजना सुरु केलेली होती.
या सर्व प्रश्नांची उत्तरे शहरातील नागरीकांना द्यावीत अशी अपेक्षा अभय इंगळे यांनी प्रेसनोट द्रावारे व्यक्त केली.