google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 न्यायव्यवस्थेच्या आडून कारखाना बंद ठेवण्याचा प्रयत्न सहन करणार नाही - तेरणा बचाव संघर्ष समिती

न्यायव्यवस्थेच्या आडून कारखाना बंद ठेवण्याचा प्रयत्न सहन करणार नाही - तेरणा बचाव संघर्ष समिती

0
उस्मानाबाद (प्रतिनिधी) न्यायव्यवस्थेच्या आडून तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना बंद ठेवण्याचा कोणी प्रयत्न करणारा असेल तर ते आपण सहन करणार नाहीत असे खडे बोल तेरणा संघर्ष समितीच्या पत्रकार परिषदेत बोलताना ॲड. अजित खोत यांनी राजकारण्यांना सुनावले आहे.

        २४ डिसेंबरला तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या प्रवेशद्वारावर संघर्ष समितीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी संघर्ष समितीचे संग्राम देशमुख,निहाल काझी,राहुल वाकुरे, अमोल समुद्रे, बबन देशमुख, एस के इनामदार, अमरसिंह देशमुख, तानाजी माळी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.


      ॲड. खोत यांनी तेरणा संघर्ष समितीची भूमिका मांडली ते म्हणाले, तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्यावर तीस हजार सभासदांचे भवितव्य अवलंबून आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेने तब्बल सहा वेळा टेंडर प्रक्रिया राबवली यानंतर हा प्रश्‍न निकाली लागला असे आशादायक चित्र निर्माण झाले. सहाव्या प्रक्रियेदरम्यान भैरवनाथ कारखाना च्या वतीने साडेपाच कोटी रुपये अनामत भरून टेंडर प्रक्रियेत भाग घेतला आणि हा कारखाना सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला असतानाच ट्वेंटीवन कारखान्याच्या वतीने देखील टेंडर प्रक्रियेत नाकारल्याचा कारणावरुन न्यायालयात धाव घेतली. 


      या कारखान्याला हाताशी धरून जिल्ह्यातील तथाकथित लोकप्रतिनिधी कारखाना बंद कसा राहील यासाठी प्रयत्नशील आहेत. या तथाकथित लोकप्रतिनिधीला संघर्ष समिती सोडणार नाही.
     न्यायव्यवस्थेच्या आडून तेरणा साखर कारखाना बंद ठेवण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर ते चुकीचं आहे आणि याला संघर्ष समिती जशास तसे उत्तर देईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top