google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 साने गुरुजी जयंती व मुख्याध्यापिका यांचा वाढदिवस शालेय साहित्य वाटप करून उत्साहात साजरा

साने गुरुजी जयंती व मुख्याध्यापिका यांचा वाढदिवस शालेय साहित्य वाटप करून उत्साहात साजरा

0

तामलवाडी:- दि. 25 डिसेंबर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झोपडपट्टी सुरतगाव तालुका तुळजापूर येथे साने गुरुजी जयंती व शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सूर्यवंशी छाया रामराव यांचा वाढदिवस शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे व अल्पोपहाराचे  वाटप करून साजरा करण्यात आला.     

  याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सी .आर .  सूर्यवंशी व सहशिक्षक ए. एस .मगर   यांचे हस्ते साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व याच दिवशी मुख्याध्यापिका यांच्या वतीने वाढदिवसाचे औचित्य साधून सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून त्यांना अल्पोपहार देण्यात आला 



यावेळी शालेय समिती व सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित   मान सन्मान करण्यात आला. याप्रसंगी शालेय समिती अध्यक्ष श्रीमती सोनाली गुंड ,सुलभाताई गुंड, अनुराधा विटकर, आशा मगर,सुनिता धोत्रे, सुरेखा साळुंके  इतर पालक व ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार आबा मगर यांनी मानले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top