google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतिराव फुले यांनी सुरू केलेली भिडेवाडा शाळा "सावित्रीबाईंची मुलींची शाळा" या नावाने पुन्हा सुरू होणार!

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतिराव फुले यांनी सुरू केलेली भिडेवाडा शाळा "सावित्रीबाईंची मुलींची शाळा" या नावाने पुन्हा सुरू होणार!

0

पुणे येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतिराव फुले यांनी सुरू केलेली भिडेवाडा शाळा "सावित्रीबाईंची मुलींची शाळा" या नावाने पुन्हा सुरू होणार!

पुण्यातील भिडेवाडा येथे १८४८ साली क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतिराव फुले यांनी मुलींची शाळा सुरू केली होती. सध्या भिडेवाडा मोडकळीस आलेला आहे. या वाड्यात फुले दाम्पत्याचे स्मारक असावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. यासंबंधी सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत नियम ९४ अन्वये अर्धा तास चर्चा उपस्थित केली होती‌. या चर्चेला उत्तर देताना ना. छगन भुजबळ यांनी ही‌ शाळा पुन्हा सुरू करणार असल्याचे सुतोवाच केले.

ना. भुजबळ म्हणाले की, मागच्या महिन्यातच पुणे येथे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली भाडेकरू, पुणे मनपा, शिक्षण मंत्री, उच्च व तंत्रज्ञान शिक्षण मंत्री आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत भिडेवाड्याच्या ठिकाणी पाच मजली इमारत बांधण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. तळमजल्यावर दुकानदारांना तिथेच दुकानासाठी जागा देऊन वरील मजल्यावरील भाडेकरूंना मनपाच्या माध्यमातून इतरत्र घर देण्यात येणार आहे. उरलेल्या मजल्यावर मुलींची शाळा आणि‌ क्रांतीज्योती सावित्रीबाईंचा भव्य पुतळा असेल, यावर बैठकीत एकमत झाल्याची माहिती मा. भुजबळ यांनी दिली.

तर नगर विकास मंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी सांगितले की‌, या कामासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू देणार नाही. नगर विकास विभाग या कामासाठी निधी देईल. तसेच कामाच्या नियोजनासाठी बैठक आयोजित केली जाईल, असेही त्यांनी‌ सांगितले.



#wintersession2021 #maharashtra #bhidewada #mahatmajyotibaphule

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top