महिला स्वयंसहाय्यता गटाच्या बॅंक मेळाव्यास मोठा प्रतिसाद

0



महिला स्वयंसहाय्यता गटाच्या बॅंक मेळाव्यास मोठा प्रतिसाद

    

       उस्मानाबाद,दि.21(जिमाका):- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा परिषद आणि उस्मानाबाद येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या संयुक्त विद्यमाने महिला स्वयंसहाय्यता समुहचा बँक मेळावा घेण्यात आला.या मेळाव्यास महिलांनी मोठा प्रतिसाद दिला.

         यावेळी मुख्य प्रबंधक शशी रंजन नारायण यांनी महिलांचे खऱ्या अर्थाने आर्थिक आणि सामाजिक उन्नती होत असल्याचे सांगितले. त्यांनी आवर्जून प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेची विषयी माहिती माहिती देऊन सर्वांना विमा काढण्याचे आवाहन केले.

       देवळाली आणि शिंगोली येथील उमेद अंतर्गत स्थापन झालेल्या गटांना यावेळी कर्ज वाटप करण्यात आले. यावेळी 40 स्वयंसहायता गटांना 86 लक्ष रुपयांचे वाटप करण्यात आले. कर्ज वाटपातून महिला स्वयंसहाय्यता गटाच्या माध्यमातून शाश्वत उपजीविका उभारणी करण्यासाठी महिलांना अभियानाच्या माध्यमातून प्रशिक्षण आणि मार्केट जोडणी करण्यासाठी मदत केली जाणार असल्याचे तालुका व्यवस्थापक नागेश काकडे यांनी सांगितले.

       हा मेळावा यशस्वी करण्यासाठी उपप्रबंधक गजानन पोकळे,  सहाय्यक प्रबंधक मुखरू नंदेश्वर, तालुका व्यवस्थापक आर्थिक समावेशन नागेश काकडे, प्रभाग समन्वयक राम भोसले, प्रभाग समन्वयक संतोष गवळी, बँक सखी कांचन भालेकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करुन राम भोसले यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top