उस्मानाबाद प्रतिनिधी उस्मानाबाद जिल्ह्यातील वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार व यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेवर बंजारा समाजातील व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याची मागणी तुळजाभवानी कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे आज दिनांक १ डिसेंबर रोजी करण्यात आलीया समाजाला न्याय मिळावा याकरिता २३ फेब्रुवारीला आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात केलेला आहे.
दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की २३ फेब्रुवारी रोजी झालेल्या शासन निर्णयानुसार वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार व यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना राबविण्यासाठी तालुका प्रतिनिधीच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे परंतु ही योजना तालुका लोकप्रतिनिधी मार्फत राबविण्याचे झाले असून तालुक्यातील तांडा वस्तीचा समतोल विकास साध्य होऊ शकत नाही
तालुका लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून ग्रामीण स्तरावर ही योजना राबविताना तळागाळातील बंजारा घटकांच्या समतोल विकासात पारदर्शकतेचा अभाव जाणवू शकतो म्हणून बंजारा समाजाच्या तांडा वस्तीच्या विकासाला खीळ बसू शकते.२७ सप्टेंबर रोजीच्या निर्णयानुसार तांडा योजनेतील कामे संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीस सुचवण्याकरिता राज्यातील ११ जिल्ह्यातील बंजारा समाजातील व्यक्तिच्या अध्यक्षेखाली वरील योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी समिती स्थापन करण्यास शासन स्तरावर प्रत्येक जिल्ह्याला मान्यता दिली आहे तरी या यादीतून उस्मानाबाद वगळला आहे.२३ फ्रेबुवारी च्या निर्णयानुसार या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीचे अध्यक्ष पद कायम ठेवण्यात आले आहे यासाठी या निर्णयात बदल करून महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यास दिलेल्या आदेशाप्रमाणे याही जिल्ह्यास बंजारा व्यक्तीची संबंधित योजनेवर अध्यक्षपदी निवड करण्यासाठी समाविष्ट करून तालुका लोकप्रतिनिधींची अध्यक्षीय समिती रद्द करून ही योजना प्रभावीपणे राबविण्यास सहकार्य करावे
उस्मानाबाद जिल्ह्यातही बंजारा समाजातील व्यक्तीची या योजनेच्या अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यासाठी सुधारित शासन निर्णय घेण्यात यावा
उस्मानाबाद जिल्ह्यातील बंजारा समाजास न्याय मिळवून देण्यात यावे अन्यथा २३ फ्रेबुवारी २०२२ रोजी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे या निवेदनावरसंघटनचे संस्थापक अध्यक्ष सुरेश हरिश्चंद्र , कोषाध्यक्ष बबुवान नंदु चव्हाण , कार्यकारी संचालिका सुशीलाताई चव्हाण, मराठवाडा युवा प्रदेश अध्यक्ष
नेताजी राठोड, प्रताप राठोड , महादेव लिंगे , रवी चव्हाण , चेतन पवार , तेजस पवार , शशिकांत राठोड , दिपक राठोड ,नामदेव चव्हाण , प्रकाश चव्हाण, हरिब चव्हाण,लय्यन चव्हाण इत्यादीच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत